Header AD

दिव्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा गरजेच्या निरंजन डावखरे...


आरोग्य केंद्र भूखंडाचा विषय अधिवेशनात उपस्थित करणार निरंजन डावखरे...


दिवा , प्रतिनिधी  :-  दिव्यातील आरोग्य केंद्राचा प्रश्न आपण येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार असून येथील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसुविधा मिळण्यासाठी भाजप आग्रही आहे अशी ठाम भूमिका भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड. निरंजन डावखरे यांनी दिवा दौऱ्या दरम्यान व्यक्त केली.


दिव्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी ठाणे भाजपच्या पदाधिकारी यांनी नुकताच दिवा शहराचा दौरा केला.या वेळी पालिका व सत्ताधारी सेनेच्या कारभारावर निरंजन डावखरे यांनी सडकून टीका केली.दिवा शहरात पाण्याची समस्या गंभीर असून देखील नागरिकांना पाणी देण्याचे नियोजन अद्याप पालिका आणि सत्ताधारी शिवसेना करू शकले नाहीत असा आरोप डावखरे यांनी केला आहे.


नागरिकांना गृहीत धरण्याचे काम केले जात असून दिवा शहरासाठी महत्त्वाचे असणारे आरोग्य केंद्र लवकरात लवकर झाले पाहिजे,त्यासाठी आरक्षित भूखंड पालिकेने ताब्यात घेतला पाहिजे यासाठी हा विषय येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार आहे अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली आहे.


यावेळी त्यांच्या बरोबर भाजप गटनेता संजय वाघुले,नगरसेवक कृष्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील,कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे,विजय भोईर,मंडळ अध्यक्ष आदेश भगत,सचिन भोईर,रोशन भगत,जयदीप भोईर,प्रशांत आंबोनकार,विजय वायदांडे,आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा गरजेच्या निरंजन डावखरे... दिव्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा गरजेच्या निरंजन डावखरे... Reviewed by News1 Marathi on February 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads