Header AD

कृतिशील तेची चार वर्ष नगरसेवक सुनेश जोशी यांचा कार्य अहवाल प्रकाशित
ठाणे, दि. २७ फेब्रुवारी : भारतीय जनता पार्टीचे ठाणे, नौपाडा येथील प्रभाग क्रमांक एकवीसचे नगरसेवक सुनेश जोशी यांच्या चार वर्षातील कामाचा अहवालाचे ख्यातनाम अभिनेते, लोकप्रिय निवेदक विघ्नेश जोशी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार संजय केळकर, भाजपाठाणे शहर जिल्हाध्यक्ष, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

 
कृतिशीलतेची चार वर्ष असे शिर्षक असलेल्या अहवालाचे प्रकाशन आज भाजपच्या ठाणे, खोपट येथील जिल्हा कार्यालयात कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करून  झाले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
कृतिशीलतेची चार वर्ष या अहवालात नगरसेवक सुनेश जोशी यांनी प्रभागात केलेल्या विविध कामांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून दिली आहे. प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये प्रामुख्याने नौपाडा, चरई, पाचपखाडी हा जुन्या ठाणे महानगराचा भाग आहे. 


यात पुनर्विकासाला चालना देण्यासाठी घेतलेला पुढाकार यासह रस्त्यांचे नव्वद टक्के काँक्रीटीकरण पूर्ण करणे, नव्या पदपथांची निर्मिती तसेच, जुन्या पदपथांची दुरुस्ती, काल मर्यादित पार्किंगच्या द्वारे पार्किंग कोंडीतून सुटका करणे, घरगुती पाईप गॅस जोडणी पूर्ण करून घेणे, प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ आणि सुंदर प्रभागासाठी विशेष मोहीम राबविणे, वाहनतळ समस्या सोडविण्यासाठी गावदेवी मैदान येथील अंडरग्राउंड वाहनतळ उभारणीच्या कामाला चालना देणे या कामांची माहिती अहवालात दिली आहे. 


ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभागात साथ ठिकाणी उभारलेले विश्रांती कट्टे, आठ हजार नागरिकांना लाभ झालेल्या डोळे, मधुमेह, रक्त अशी आरोग्य शिबीर, रोजगार, आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, विविध दाखले आणि नाव मतदार नोंदणी अशी बहुपयोगी शिबिर आणि एस-कनेक्ट् हे नागरिकांना उपयुक्त ठरणारे ऍप याचीही माहिती या अहवालात आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यासाठी सुरु केलेल्या कामांचा उल्लेख अहवालात आहे. 


गेल्या वेळी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुनेश जोशी हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले. अवघ्या चार वर्षात नगरसेवक सुनेश जोशी यांनी आपल्या कार्यपद्धतीने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. कृतिशील लोकप्रतिनिधी म्ह्णून सुनेश जोशी यांना चार पुरस्कार मिळाले आहेत. सुनेश जोशी यांच्या कामाची दखल ठाण्याच्या विविध वर्तुळात घेतली जात आहे.
कृतिशील तेची चार वर्ष नगरसेवक सुनेश जोशी यांचा कार्य अहवाल प्रकाशित कृतिशील तेची चार वर्ष नगरसेवक सुनेश जोशी यांचा कार्य अहवाल प्रकाशित Reviewed by News1 Marathi on February 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads