Header AD

वित्त व्यवस्थापनात तंत्र ज्ञानाने आणली क्रांती
◆आजच्या युगात तंत्रज्ञान हे अपरिहार्य बनले आहे. ऑटोमेशन व मोबाइल अॅप आधारीत सेवांच्या या दशकात बीएफएसआय क्षेत्र ग्राहकांसाठी तंत्रज्ञान-सक्षम सेवा एकिकृत करण्यात अग्रेसर आहे. परवडणारे स्मार्टफोन, टॅबलेट, कंप्यूटर व इतर इंटरनेटवरील उपकरणांनी वित्तीय व्यवस्थापन वापरणे सोपे करण्यासाठी नवा मार्ग आखला आहे. आज डिमॅट खाते उघडणे, फंड्स ट्रान्सफर करणे, फिक्स किंवा रिकरिंग डिपॉझिट सुरु करणे आणि लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे ही अगदी सोपी गोष्ट बनली आहे. यात भर म्हणजे, २०१६ मधील नोटाबंदीमुळे डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड बदल झाला. तसेच मोबाइल अॅप्सनी वैयक्तिक वित्तीय सेवा दिल्या असल्याने, पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी अगदी प्रत्येकात पर्याय दिलेले आहेत. वित्त व्यवस्थापनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाने कशा प्रकारे क्रांती आणली आहे याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी.


क्रांती व तिचे परिणाम: वित्तीय क्षेत्रातील स्पर्धा ही केवळ बँक व त्यासंबंधी संस्थांपुरती मर्यादित नाही. फिनटेक कंपन्या आणि इतर क्षेत्रातही तिचे परिणाम दिसून येतात. बिझनेस मॉडेलप्रमाणेच, डिजिटल सॅव्ही ग्राहकांच्या मागण्यां पुरवण्याकरिता नोकऱ्यांचे स्वरुपही बदलले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन व मशीन लर्निंगद्वारे चालणारे अॅप्लिकेशन्स ग्राहकांच्या सुरक्षेची हमी देतात. ओळख दाखवून केलेली चोरी व फसवणुकीविरोधात लढण्यासाठी यात वाढीव सुरक्षेच्या सुविधाही आहेत.


आपल्या बिझनेस मॉडेल व कार्यप्रणालीत बदल करण्यासाठी गुंतवणूक करण्यावर आधी बँका उत्सुक नव्हत्या. नव्या युगातील वित्तीय कंपन्यांनी अधिक तीक्ष्ण कार्यप्रणाली शोधून काढल्याने वेगाने वाढणाऱ्या टेक इंडस्ट्रीने त्यांना झोपेतून जागे केले. ते आता क्राऊड-फंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे डिझाइन केलेल्या इतर ऑनलाइन मॉडेल्स, एनबीएफसीचे पीअर-टू-पीअर लेंडिंग मॉडेल, ब्रोकरेज फर्मचे बिट-कॉइन व अल्गो ट्रेडिंग इत्यादींशी स्पर्धा करत आहेत. एवढेच नाही तर ग्राहकदेखील वेगवान वित्तीय व्यवहार प्रणालीला सराईत होत आहेत.


स्वरुप बदललेल्या इतर वित्तीय सेवा: शेअर बाजाराच्या प्रकरणात, ग्राहक हे त्यांना जागतिक व देशांतर्गत इकोनॉमिक आउटलूक, गुंतवलेल्या प्रत्येक स्टॉकचे डिटेल्स, बाजाराची कामगिरी इत्यादींबद्दल सखोल माहिती घेण्यासाठी अॅपचे मॅनेजमेंट करण्यास सक्षम असतात. एक दशकभरापूर्वी स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर रांगा लावणाऱ्या ट्रेडर्ससाठी आजचे ट्रेडर्स ज्या चपळाईने सर्व व्यवहार करतात, ते चित्र अकल्पनीय असेच होते. ज्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) इकोसिस्टिम सर्वांसाठी उपलब्ध करण्याकरिता काम केले, त्या प्रतिभावान विचारवंतांना या क्रांतिकारी बदलाचे श्रेय द्यावे लागेल. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील एसएमएमईंसह कॉर्पोरेट हाऊसमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यातही एकदाच थेट पगार जमा केला जाऊ शकतो.


याचप्रमाणे, ई-कॉमर्स, इन्शुरन्स किंवा हेल्थकेअर इंडस्ट्रीमधील पेमेंटच्या पद्धती आणि व्यवहारांची प्रक्रिया एखाद्याच्या बँक खात्याशी बांधील आहे. त्यामुळे पूर्वीची प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया बंद पडली असून स्मार्ट वित्तीय व्यवस्थापनाची साधने प्रत्येक यूझरपर्यंत पोहोचली आहेत, हे दिसून येते. आज इन्शुरन्स एजंट्स संभाव्य ग्राहकांना दुरूनच अधिकृत करू शकतात. यासाठी डिजिटल केवायसी प्रक्रिया वापरली जाते. रिटेलर्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर साइन अप करून त्यांची उत्पादने पेमेंट गेटवेच्या माध्यमातून विकू शकतात. अॅपवर आरोग्यविषयक सल्ला दिला जातो तर शुल्कही डिजिटली भरली जाते. प्रत्येक इंडस्ट्री मायक्रो-लेव्हल-फायनान्शिअल सिस्टिमशी डिजिटल पद्धतीने जोडली गेली आहे. यातून सत पैसा, व्यवहार, वैयक्तिक वित्तीय आरोग्य मूल्यांकनाची सतत सुनिश्चिती केली जाते.


वित्तीय व्यवस्थापनाचे भविष्य काय असेल?

आज भारतात अगदी दूर असलेल्या लोकांपर्यंत वित्तीय प्रणाली खुली झाली आहे, त्यामुळे यातून काही आव्हाने व संधीही निर्माण झाल्या आहेत. या दोन्ही बाबींसाठी तंत्रज्ञानाने कधीही जास्त महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली नाही. फसवणुकीचे व्यवहार शोधण्यात तंत्रज्ञान साधन म्हणून वापरले जाऊ शकते तसेच ज्यांना कर्ज देण्यास समर्थ ठरवले नाही, त्यांनाही पत-कर्ज देण्याचे व्यवस्थापन करण्यात आले.


पुढील काही वर्षांमध्ये टीअर ३ व ४ शहरांमध्ये लाखो ग्राहक तयार होतील. नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकिंग, ब्रोकरेज, लेंडिंग सेवा इत्यादींसाठी डिजिटल सहजता पुरवली जाईल. तसेच, इंडस्ट्री अंतर्गत सहकार्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून ब्लॉकचेन आणि एआय समर्थित व्यवहार होतील. हे व्यवहार अगदी सामान्य व व्यवस्थित सरावाचे होतील. एक क्रांतिनंतर इंडस्ट्री ४.० ने तिचा प्रवास पुन्हा सुरु केला आहे, यातून विशिष्ट संस्था, स्टार्ट-अप्स, वित्तीय प्रणाली आणि त्यातून निर्माण झालेले बदल हे कायमस्वरुपी राहतील.

वित्त व्यवस्थापनात तंत्र ज्ञानाने आणली क्रांती वित्त व्यवस्थापनात तंत्र ज्ञानाने आणली क्रांती Reviewed by News1 Marathi on February 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads