Header AD

जिलानी इमारत दुर्घटना ग्रस्तांच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप
ठाणे ,  प्रतिनिधी  :  आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांस राज्य शासनातर्फे ३ लाख तर केंद्र शासनातर्फे २ लाख अशी एकूण रु.५ लाख नुकसान भरपाईच्या माध्यमातून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर भिवंडीचे आमदार श्री.रईस शेख आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. 


दिनांक २१ सप्टेंबर, २०२० रोजी मध्यरात्री अचानक जमीनदोस्त झालेल्या भिवंडीतील सय्यद जिलानी बिल्डिंग दुर्घटनेत एकूण ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर २१ नागरिक गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे लवकरात लवकर मदत मिळण्याबाबत राज्याच्या भूकंप व पुनर्वसन मंत्री यांचेकडे अनेक निवेदने सादर करून सततचा पाठपुरावा केल्याचे हे फलीत आहे असे मत आ.रईस शेख यांनी व्यक्त केले. 


तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडीतील जुन्या इमारती दुर्घटना व अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर योजना अंमलात आणण्याबाबत मार्गदर्शन केले. अगदी कमी वेळामध्ये सहाय्यता निधी मंजूर करून वाटप केल्याने आ.रईस शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री एकनाथजी शिंदे, महाविकास आघाडीतील भूकंप व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.

जिलानी इमारत दुर्घटना ग्रस्तांच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप जिलानी इमारत दुर्घटना ग्रस्तांच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads