Header AD

शिवसेना शहरप्रमुख मा नगरसेवक राजेश मोरे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांच्या मदतीला धावले ....


 

पालिकेने तोडलेले इमारतीचे पाणी कनेक्शन पुन्हा जोडले.....


 

डोंबिवली , शंकर जाधव : धोकादायक इमारत आणि या इमारतीत राहणारे भाडेकरू यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पालिका प्रशासन अश्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना घरे रिकामे करण्याची नोटीस बजावून पाणी कनेक्शन कट करते. इतकी वर्षे राहिलेल्या रहिवाशी आपल्या घर मिळणार नाही या काळजीने तिथेच राहतात.मात्र नियमाप्रमाणे धोकादायक इमारतीत रहिवाश्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना त्या इमारतीत राहू दिले जात नाही.तशी नोटीसही बजावली जाते.अश्या रहिवाश्यांच्या मदतीला शिवसेनेचे  माजी नगरसेवक तथा डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे धावून आले.डोंबिवली पूर्वेकडील  संगीतावाडी १संगीतावाडी २ आणि सरोजस्मृती या तीन धोकादायक इमारतीचे शुक्रवारी पालिका प्रशासनाने पाणी कनेक्शन कट केले.रहिवाश्यांनी माजी नगरसेवक राजेश मोरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
मोरे यांनी रहिवाश्यांना बरोबर घेऊन डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात ''प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेहा करपे यांची भेट घेतली.चर्चेअंती सदर इमारतीचे कट केलेले पाणी कनेक्शन पुन्हा जोडण्याची विंनती मोरे यांनी केली.त्यांच्या विनंतीला मान देत इमारतीचे कनेक्शन पुन्हा जोडले.याबाबत राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणालेशिवसेना सदैव जनतेच्या बाजूने राहिली  आहे.इमारत मालकाने या रहिवाश्यांना घरे दिली नाहीत तर शिवसेना आपल्या पद्धतीने रहिवाश्यांना न्याय मिळवून देईल असे सांगितले.धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासनही मोरे यांनी यावेळी रहिवाश्यांना दिले.
तर शिवसेना आपल्या पाठीशी उभे असल्याचे पाहून रहिवाश्यांनी शिवसेनेचे आभार मानले.तर ``प्रभाग क्षेत्र अधिकारी  स्नेहा करपे यांना विचारले असता त्या म्हणाल्यापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना गेल्या दोन ते तीन वर्षापासून नोटीसा बजावल्या आहेत. संगीतावाडी १संगीतावाडी २ आणि सरोजस्मृती या तीन अतिधोकादायक इमारतीना नोटीसा बजावल्या होत्या.सदर इमारतींचेरहिवाश्यांनी माझ्या कार्यालयात भेट घेतली असता त्यांना इमारतींचे  स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले आहे.

शिवसेना शहरप्रमुख मा नगरसेवक राजेश मोरे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांच्या मदतीला धावले .... शिवसेना शहरप्रमुख मा नगरसेवक राजेश मोरे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांच्या मदतीला धावले .... Reviewed by News1 Marathi on February 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads