Header AD

आदिवासी धोडदे पाड्यातील महिलांची पाण्या साठीची पायपीट थांबली जाणीव प्रतिष्ठानने लायन्स क्लबच्या सहाय्याने साधला विकास

 भिवंडी दि.२७ (प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी गणेशपुरी जवळील आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोडदे पाडा या आदिवासी वस्तीतील पिण्याच्या पाण्यासाठी दररोज होणारी एक किलोमीटरची पायपीट येथील जाणीव प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने लायन्स क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या माध्यमातून नळपाणी योजना राबवून  पाड्याचे रूप विविध विकास योजना राबवून पाड्याचे रूप पालटवून टाकले आहे.


साधारण चारशे लोकवस्ती असलेल्या धोडदे पाडा येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी येथे असलेल्या एकमेव विहिरीवर अवलंबून रहावे लागत असे आणि दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सदर विहीर आटल्यावर येथील महिलांना एक किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत असे त्यांची ही अडचण  जाणीव प्रतिष्ठानचे भुपेंद्र शहा आणि उमेश महाडिक यांना समजल्यावर त्यांनी  लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे यांच्या पदाधिकाऱ्यांशी सम्पर्क साधून सदर पाण्याची समस्या लक्षात आणून दिल्यावर लायन्स क्लबने चार लाख रुपये खर्च करून सदर पाड्यासाठी बोअरवेल मारून देऊन स्वतंत्र नळपाणी योजना राबवून सर्व घराच्या दारापर्यंत पाणी उपलब्ध करून देऊन या महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवली आहे.


 तर जाणीव प्रतिष्ठानने लायन्स क्लबच्या माध्यमातून येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला लादी बसविण्यात येऊन गळके पत्रे बदलवून शाळेची आकर्षक रंगरंगोटी करून देऊन शाळेचे चित्र पालटवून टाकले आणि त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन संगणक आणि दोन प्रिंटरही देण्यात येऊन संगणकाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाची व्यवस्था करून दिली तर गावात रात्री उजेडासाठी दहा स्ट्रीट लाईट लावून दिले.याच्या
 उद्धाटनावेळी पाड्यातील ग्रामस्थांना तीस हजार रुपयांचे फळ झाडे आणि फुल झाडे यांचे वाटप करण्यात आले.


या सर्व उपक्रमात लायन्स क्लब ऑफ बॉम्बेचे गव्हर्नर, सदस्या रेश्मा कुकरेजा,सदस्य गोलिया,गर्ग आणि ईतर सर्व सदस्यांनी विशेष योगदान दिले तर या पाड्याचे रूप पालटवणारे जाणीव प्रतिष्ठानचे अद्यक्ष भुपेंद्र शहा आणि उमेश महाडिक यांनी तीन महिने पाठपुरावा करून लायन्स क्लबच्या माध्यमातून सदर विकास कामे करून दिल्याने यांचे आभार व्यक्त करताना येथील आदिवासी बांधवांना भरून आले होते.
आदिवासी धोडदे पाड्यातील महिलांची पाण्या साठीची पायपीट थांबली जाणीव प्रतिष्ठानने लायन्स क्लबच्या सहाय्याने साधला विकास आदिवासी धोडदे पाड्यातील महिलांची पाण्या साठीची पायपीट थांबली जाणीव प्रतिष्ठानने लायन्स क्लबच्या सहाय्याने साधला विकास Reviewed by News1 Marathi on February 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads