Header AD

क्रांति कारक वासुदेव फडके यांना शौर्यांजली अर्पण

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त कल्याण पूर्वेतील कचोरे प्रभागातील नेतीवली टेकडीवरील गुफेच्या ठिकाणी त्यांना शौर्यांजली वाहण्यात आली.


आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी काहीकाळ कचोरे येथील गुफेत वास्तव्य केले होते. यामुळे त्यांच्या या गुफेला महत्व असून या गुफेच्या ठिकाणी इतिहास संकलन समिती कोंकण प्रांत व श्रीराम सेवा मंडळ कचोरे डोंबिवली शहर इतिहास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शोर्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेले अनेक वर्षे कचोरे प्रभागातील श्रीराम सेवा मंडळ हे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती साजरी करत असून पुण्यतिथीला शौर्याजलीं अर्पण करून आपल्या  शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत.


यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, इतिहास संकलन समिती कोंकण प्रांत प्रतिनिधी खेडेकरचंद्रकांत जोशी, स्थानिक नगरसेविका रेखा चौधरीमिहीर देसाई, मंदार हळबेखुशबू चौधरी, बजरंग दल कल्याण जिल्हा सहसंयोजक राजन चौधरी, श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष आतिश चौधरीसत्येंद्र दुबे, प्रभाग अधिकारी भरत पाटील यांच्या बरोबरच डोंबिवली शहर इतिहास मंडळबजरंग दल संघ परिवार आणि श्रीराम सेवा मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

क्रांति कारक वासुदेव फडके यांना शौर्यांजली अर्पण क्रांति कारक वासुदेव फडके यांना शौर्यांजली अर्पण Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads