Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोनाची दुपटीने वाढ


◆मंगळवारी ५४ रुग्ण तर बुधवारी १२८ कोरोना रुग्णांची नोंद...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राज्यातील काही जिल्ह्यासह मुंबईत कोरोनाचा  प्रसार पुन्हा एकदा वाढल्याने त्याची झळ आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही हळुहळु पसरायला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली शहरात मंगळवारी कोरोनाची ५४ रुग्ण सापडल्या नंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपटीने १२८ कोरोना रुग्ण सापडल्याची नोंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब झाली आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज नव्या १२८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे. आजच्या या १२८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,३८१ झाली आहे. यामध्ये ८३१ रुग्ण उपचार घेत असून ५९,३९९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१५कल्याण प – ५०डोंबिवली पूर्व – ४४,  डोंबिवली प – १३मांडा टिटवाळा – ३ तर मोहने येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण पश्चिम परिसर हा बहुतांश दाटीवाटीचा असून गतवर्षी कोरोना पादुर्भावाच्या संसर्गाचा कालावधीत सर्वात जास्त कोरोना रुग्ण कल्याण पश्चिमे कडील काही भागात सापडल्याने कल्याण पश्चिम परिसर कोरोनाचा हॉट स्पॉट बनला होता. बुधवारी सापडलेल्या कोरोनाच्या १२८ रूग्णांपैकी ५० रुग्ण कल्याण पश्चिम परिसरात सापडल्याने पुन्हा एकदा कल्याण पश्चिम परिसर  हॉटस्पॉट च्या दिशेने आगेकूच करीत असताना दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाची दुपटीने वाढ  कल्याण डोंबिवलीत कोरोनाची दुपटीने वाढ Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads