Header AD

केडीएमसी अधिकाऱ्या विरोधात वीज चोरीची तक्रार दाखल अधिकाऱ्याने फोडले ठेकेदारावर चोरीचं खापर
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  एकीकडे  लॉकडाऊन काळातील वीज बिलासाठी  सर्वसामान्यसह व्यापाऱ्यांवर बिल वसुलीची धडक मोहीम  महावितरणने सुरु केली असतानाचएका रसवंतीगृहाच्या वीज मीटरमधूनच कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्याने चोरीछुपे वीज कनेक्शन घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रसवंतीगृहाच्या मालकाने महावितरण अधिकाऱ्याकडे पुराव्यासह वीज चोरीची तक्रार दाखल करताचकेडीएमसीच्या अधिकाऱ्याने मात्र वीज चोरीचे खापर ठेकेदारावर फोडले आहे.


       कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोरच ५० वर्षांपूर्वीची मुस्तफा मंजिल नावाची इमारत जर्जर झाल्याने हि इमारत महापालिकने अतिधोकादायक घोषित करून या इमारतीला जमीनदोस्त करण्याचे काम महापालिकेच्या 'प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्या देखरेखीत गेल्या ५ दिवसापासून जेसीबीपोकलेनवेल्डिंग मशीनसह रात्रीच्या वेळी विजेचे दिवे लावून इमारतीचे पाडकाम सुरु आहे. मात्र या सर्वाना लागणारा वीज पुरवठा या इमारतीलगत असलेल्या गणेश रसवंती गृहाच्या वीज मीटर मधून मालकाची परवानगी न घेताचोरीछुपे त्यांच्या वीज मीटर मधून वायरी जोडून वीज पुरवठा करीत होते.


आज सकाळी वीज मीटरमधून दुसरीकडे जाणाऱ्या वायरी रसवंतीचे मालक धनंजय शिंदे यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी तत्काळ महावितरणचे कार्यलय गाठत पालिका अधिकाऱ्यांच्या वीज चोरीची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही प्रकारची अपघातापासून बचावासाठी सुरक्षेचे साधन दिली नसल्याचेही आढळून आले आहे.


याबाबत कल्याण पश्चिम विभाग महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड यांच्याशी संपर्क साधला असतातक्रार अर्जाची शहानिशा करून वीज चोरी प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे उपकार्यकारी अभियंता प्रसाद कोहरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून चोरून लावलेल्या वायरी जप्त केल्या आहे. तर प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांनी सांगितले किजरी महापालिका इमारतीचे पाडकाम करीत आहे. तरी मात्र या पादकामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने हा वीज चोरीचा प्रकार केल्याचे सांगत वीज चोरीच्या प्रकरणातून आपला बचाव करण्यासाठी चोरीचं खापर ठेकेदारवर फोडल्याचे दिसून आले आहे.


रसवंती गृहाचे मालक धनंजय शिंदे हे तक्रार देण्यासाठी महावितरण कार्यलायत गेले असतासंबंधित महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांनाजर आमच्या विरोधात वीज चोरीची तक्रार दिली तर तुझे दुकान तोडून टाकून अशी धमकी दिल्याचे रसवंती मालक शिंदे यांनी सांगितले.


केडीएमसी अधिकाऱ्या विरोधात वीज चोरीची तक्रार दाखल अधिकाऱ्याने फोडले ठेकेदारावर चोरीचं खापर केडीएमसी अधिकाऱ्या विरोधात वीज चोरीची तक्रार दाखल अधिकाऱ्याने फोडले ठेकेदारावर चोरीचं खापर Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads