Header AD

एमजी मोटरची झूमकार व ओरिक्स सह भागीदारी


झेडएस ईव्हीच्या ग्राहकांना विविध मोबिलिटीचे पर्याय प्रदान करण्याचा उद्देश ...


मुंबई, ३ फेब्रुवारी २०२१ : एमजी मोटर इंडियाने आज एमजी सबस्क्राइब अंतर्गत झूमकार व ओरिक्ससह मासिक ४९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत झेडएस ईव्ही सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध करून दिली. या ऑफरमुळे योग्य निर्णय घेणाऱ्या ग्राहकांना ३६ महिन्यांसाठी शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्हीचा अनुभव घ्यायला मिळेल.


एमजी मोटर सीएएसई (कनेक्टेड-ऑटोनॉमस-शेअर्ड-इलेक्ट्रिक) या दृष्टीकोनानुसार ग्राहकांना शेअर्ड मोबिलिटीचे पर्याय प्रदान करते. या भागीदारीतून झूमकार आणि ओरिक्ससह झेडएस ईव्हीच्या ग्राहकांना विविध मोबिलिटीचे पर्याय प्रदान केले जातील. सुरुवातीची ऑफर ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी मुंबईत ४९,९९९ रुपये दरमहा अशी उपलब्ध आहे.


झेडएस ईव्ही सध्या मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरू येथे सबस्क्रिब्शनसाठी उपलब्ध आहे. लवकरच यात आणखी शहरे जोडली जातील. या प्रोग्रामअंतर्गत एमजी झेडएस ईव्ही १२, १८, २४, ३० आणि ३६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन पर्यायांसह उपलब्ध होते. भागीदारीचा भाग म्हणून एमजी मोटर इंडिया ‘एमजी सबस्क्राइब’ नावाच्या वाहन सबस्क्रिप्शनसाठी झूमकारच्या एंड-टू-एंड टेक्नोलॉजीचा लाभ घेईल. ओरिक्स हा वाहन डिप्लॉयमेंट भागीदार म्हणून व भारतातील सर्वात मोठा शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्म म्हणून झेडएस ईव्ही सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध करून देईल.

एमजी मोटरची झूमकार व ओरिक्स सह भागीदारी एमजी मोटरची झूमकार व ओरिक्स सह भागीदारी Reviewed by News1 Marathi on February 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads