Header AD

शासकीय औषधांचा साठा कचऱ्यात फेकला,जिल्हा परिषद सभापतींनी केली चौकशी ची मागणी

भिवंडी : दि  २२ ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत परदेशातील वापरलेले एन ९७ मास्क फेकल्याचे प्रकरण करोना काळात मागील वर्षी उघडकीस आले असतानाच ,पुन्हा एकदा याच मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील रस्त्या लगत मोठ्या प्रमाणावर ओषध साठा कचऱ्यात फेकून दिल्याचे आढळून आले आहे .


          विशेष म्हणजे या सर्व औषध साठ्याची वापरण्याची मुदत अजून संपलेली नसून या मध्ये हरियाणा सरकार साठी बनविलेल्या औषधांचा सुद्धा समावेश असून काही डॉक्टर मंडळींना देण्यासाठी बनविलेली सॅम्पल पाकिटे सुद्धा आहेत .या गंभीर बाबी कडे कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नसून ही कचऱ्यात फेकलेली औषधे कोणी उचलून नेत त्याचा वापर करून
दुरुपयोग होऊ शकतो एवढे नक्की.


         या बाबत जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांच्याशी संपर्क साधून या बाबत महिती दिली असता त्यांनी ही बाब गंभीर स्वरूपाची असून या बाबत चौकशी होऊन सदरचा औषध साठा कचऱ्यात फेकणाऱ्यास शोधून काढून कारवाई करण्याची मागणी केली आहे .या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही .
शासकीय औषधांचा साठा कचऱ्यात फेकला,जिल्हा परिषद सभापतींनी केली चौकशी ची मागणी शासकीय औषधांचा साठा कचऱ्यात फेकला,जिल्हा परिषद सभापतींनी केली चौकशी ची मागणी Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads