Header AD

एमजी हेक्टर प्लस ७ सीटर नव्या ‘सिलेक्ट’ पर्यायासह उपलब्ध

 मुंबई, २ फेब्रुवारी २०२१ : एमजी मोटर इंडियाने नुकत्याच लाँच केलेल्या एमजी हेक्टर प्लस ७ सीटर प्रकारात ‘सिलेक्ट’चा पर्याय जोडला आहे. एमजी हेक्टर प्लस ७ सीटरचा सिलेक्ट हा नवा प्रकार १८.३२ लाख रुपये (एक्स-शोरुम) रुपये किंमतीत उपलब्ध आहे. एमजी हेक्टरच्या ५ सीटर शार्प व्हर्जनप्रमाणेच तिची किंमत आहे. 


एमजी हेक्टर प्लस ७ सीटरमधील नवा सिलेक्ट व्हेरिएंट हा इंटरनेट एसयूव्ही असून यात १८ इंच स्टायलिश ड्युएल-टोन अलॉय तसेच वायरलेस चार्जिंगच्या स्वरुपात अतिरिक्त उपकरणे व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आहेत. तसेच यात ऑटो-डिमिंग रिअर-व्ह्यू मिरर व इन्फोटेनमेंट युनिटसाठी हिंग्लिश व्हॉइस कमांड सपोर्ट आहे. नव्या सिलेक्ट प्रकारात अधिक प्रवाशांसाठी जागा आहे. कारण दुस-या ओळीत ३ प्रौढांसाठी लेदर सीट्स आणि तिस-या ओळीत दोन मुलांसाठी जागा आहे.


७ सीटर एमजी हेक्टर प्लसमध्ये इंजिन स्टार्ट अलार्म असून क्रिटिकल टायर प्रेशरसाठी इन-कार व्हॉइस अलर्ट आहे. इंटरनेट एसयूव्ही कारमधील अनेक फंक्शन पार पाडण्यासाठी ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्सद्वारे नियंत्रित करता येते. यात सनरुफ (खुल जा सिम सिम), एफएम (एफएम चलाओ), एसी (टेंपरेचर कम कर दो) इत्यादी अनेक कमांड्सचा समावेश आहे. एमजी हेक्टर प्लस ७ सीटरचे नवे सिलेक्ट व्हेरिएंट ६० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फिचर्ससह येते. 


यात नव्याने समाविष्ट झालेल्या सुविधांमध्ये अॅपल वॉचवरील आय स्मार्ट अॅप, गाना अॅपमध्ये गाण्यासाठी व्हॉइस सर्च, वाय फाय कनेक्टिव्हिटी, अॅक्युवेदरद्वारे हवामानाचा अंदाज आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हेक्टर २०२१ ची श्रेणी आता अधिक विकसित झाली आहे. कारण ती बऱ्याच फर्स्ट इन सेगमेंट वैशिष्ट्यांसह आणि पसंतीच्या अनेक पर्यायांसह उपलब्ध आहे.

एमजी हेक्टर प्लस ७ सीटर नव्या ‘सिलेक्ट’ पर्यायासह उपलब्ध एमजी हेक्टर प्लस ७ सीटर नव्या ‘सिलेक्ट’ पर्यायासह उपलब्ध Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads