टिटवाळ्यात अनाधिकृत बांधकामावर मनपाची कारवाई
कल्याण , कुणाल म्हात्रे : "अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा, मोहीली परिसरातील अनाधिकृत रूम, अनाधिकृत जोते "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा उचलित हातोडा चालवित अनाधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याची धडक कारवाई केली.
"अ" प्रभागातील टिटवाळ्यातील वासुंद्री रोड, मांडा मोहीली गाव परिसरातील ८ अनाधिकृत रूम, अनाधिकृत १२ जोते तसेच आर के नगर परिसरातील ४ अनाधिकृत रुमवर अनाधिकृत बांधकाम पथकाने हातोडा चालवित अनाधिकृत बांधकामे भुईसपाट केली. या कारवाईसाठी १ जे.सी.बी, अनाधिकृत बांधकाम विभागचे ३ पोलीस कर्मचारी तसेच अनधिकृत बांधकाम पथकाचे ८ कर्मचारी, असा फौज फाटा होता.
" आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त उमाकांत गायकवाड यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

Post a Comment