Header AD

आमदारांच्या फार्म हाउस मध्ये आढळले ४ अजगर

 

◆चौरे गाव परिसरात ४ अजगरांना सर्प मित्रांनी दिले जीवन दान....    


                     

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण ग्रामीण मधील  मामणोली नजीकच्या चौरे गाव परिसरात आमदार गणपत गायकवाड यांच्या फार्म हाँऊसमध्ये  बुधवारी तब्बल ४ अजगर आढळल्याने फार्म हाऊसमध्ये उपस्थितांची भितीने धादंल उडाली.


 

      प्रसंगावधन दाखवित चंद्रकांत जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रिकाम्या ड्रममध्ये ठेवले आणि सर्पमित्र दत्ता बोंबे यांना फोन करून सांगितले. सर्पमित्र दत्ता बोंबेज्ञानेश्वर सुतारसिद्धी गुप्ता आणि हितेश करंजवकर यांनी घटनास्थळी पोहचत अजगरांना ताब्यात घेत वनपाल एम.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याच्या जगंलात नैसर्गिक आधिवासात सोडत जीवनदान दिले.

 


"हिवाळ्यात अजगर जातीचा सापांचा हा प्रजनन काळ असूनमादी साप फेरोमोन नावाचा गंद सोडत असते व आजूबाजूचे नर साप त्या गंधला आकर्षित होऊन मादी सापाचा अवती -भवती जमा होतात. या गोष्टी मुळे देखील हे चार अजगर आढळले असावे असे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.


 

तर चंद्रकांत जोशी हे आमदार गणपत गायकवाड यांच्या फार्महाऊसवर केअर टेकर असून त्यांनी वन जीवन वाचवण्याचे काम केले आहे. एका वेळी भला मोठा अजगर पकडताना सर्पमित्रांचीही तारांबळ उडते,  परंतु चंद्रकांत जोशी यानी धाडस करून चारही अजगर पकडण्याचे  साहस केले. या कामगिरी साठी वनविभाग व सर्पमित्रांन कडून चंद्रकांत जोशी यांचे कौतुक केले जात आहे. 

आमदारांच्या फार्म हाउस मध्ये आढळले ४ अजगर आमदारांच्या फार्म हाउस मध्ये आढळले ४ अजगर Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads