Header AD

मुंबई नंदुरबार ग्रामीण- शहरी वास्तव्याचा सामाजिक प्रवास
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  प्रत्यक्ष समाजकार्य व त्यातील प्रत्येक छोटी मोठी घटना विद्यार्थ्यांना टिपता यावी व त्यांना परिस्थितीची सत्यता कळावी यासाठी ग्रामीण व शहरी भागात शिबीर घेऊन विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक गोष्ट वास्तव्यात अनुभवता यावी या उद्देशाने सामाजिकराजकीयआर्थिकसांस्कृतिक परिस्थिती समजावून घेत युवकांचे संवाद हे सामाजिक शिबीर नुकतेच नंदुरबार येथे संपन्न झाले.

ग्रामीण व शहरी भागातील अंतर अनेकांगी कमी करण्यासाठी ग्रामीण- शहरी वास्तव्याचा सामाजिक प्रवास ही संकल्पना प्रा. डॉ. प्रभा तिरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आणि संकल्पनेला प्रत्यक्ष राबवण्याचे काम अविनाश पाटील करत आहेत. मुंबईनंदुरबार आणि धुळे येथील समाजकार्याच्या महाविद्यालयातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थी या प्रवासात सहभागी झाले होते. या शिबिराच्या माध्यमाने आजवर रायगडधुळेअमरावतीठाणे येथे ही शिबीरे झाली.


युवकांनी आपल्या सामाजिक जीवनात असे प्रत्यक्ष परिस्थितीला भिडणारे काम केले त्याचा अनुभव घेतला तर नक्कीच सामाजिक विकासाला अनुकूल तरुण तयार होतील असे शिबीर मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रभा तिरमारे यांनी सांगितले. गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला आंबेडकरांनी खेड्याच्या विकासासाठी लोकांनी शहरांत यावे असे सांगितले होते या दोन्ही तात्विक मतांचा संतुलन ठेऊन विकास करायचा असेल तर आजच्या युवकांनी ग्रामीण शहरी वास्तविकतेचे भान असणे गरजेचं आहे त्यासाठीच हा प्रयत्न आहे असे त्या म्हणाल्या.


ग्रामीण शहरी सामाजिक वास्तव्याच्या या प्रवासाच्या निमित्ताने होणार संवाद येणाऱ्या काळात अनेकांगी सकारात्मक बदल समाजात नक्कीच घडवून आणेल त्याचबरोबर चांगले सामाजिक कार्यकर्ते या संपूर्ण प्रक्रियेत तयार होतील असे शिबीर समन्वयक अविनाश पाटील यांनी यावेळीं सांगितले. लेसली डिसुझाअपूर्वा शिंदेतुषार वारंगचेतन पाटीलदत्तात्रय वाघमारे यांनी शिबिर नियोजनात मोलाचे सहकार्य केले.


मुंबई नंदुरबार ग्रामीण- शहरी वास्तव्याचा सामाजिक प्रवास  मुंबई नंदुरबार ग्रामीण- शहरी वास्तव्याचा सामाजिक प्रवास Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पाथर्ली गावठाण येथे रस्त्याच्या क्राँकिटी करणाचा कामाचा शुभारंभ

डोंबिवली  ( शंकर जाधव )   प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील भारतीय   जनता पक्षाचे नगर निलेश म्हात्रे यांच्या प्रभागात     रस्त्याच्या क्राँकिटीकरण...

Post AD

home ads