Header AD

सर्प मित्रां कडून ५ सापांना जीवदान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : डिसेंबर महिन्यापासून  हवामानातील  बदलावामुळे  विषारी - बिन साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना सतत घडत आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवसात  कल्याण पश्चिमेकडील परिसरातील मानवीवस्तीतुन ५  विषारी - बिन विषारी साप सर्पमित्रांने  पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.


  

खडकपाडा परिसरात असलेल्या एका ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरु असताना एका कामगाराला  भलामोठा काळ्या रगांचा अंगावर चट्टेबट्टे असलेला साप दिसला. या सापाला पाहून कामगारांनी पळ काढून तासभर काम बंद केले होते. त्यांनतर एका कामगाराने या सापाची माहिती सर्पमित्र  दत्ता  बोबें यांना दिली. सर्पमित्र  दत्ता यांनी या सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप मण्यार जातीचा असून  खूपच विषारी आहे.         दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका घराच्या भिंती लगत विषारी कोब्रा नाग सिमेंट साहित्यात  शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले,  हा साप ४   फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अश्या  कोब्रा  जाती  आहे.  सर्पमित्र  दत्ता  यांनी या कोब्रा  सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.तिसऱ्या घटनेत  एक लांबलचक  साप गॅलरीच्या ग्रीलमध्ये  शिरल्याची माहिती मिळताच  सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला पकडले,  हा साप ५  फूट लांबीचा असून धामण जाती  आहे. चौथ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर गोदामात  गोदामातून सिमेंटची गोणी काढताना एका   मजुराला भलामोठा साप अर्धवट मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला दिसला. त्याने याची माहिती मालकाला दिली. त्यांनतर मालकाने सर्पमित्र दत्ता बोबे  यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता आणि सर्पंमैत्रीण सिद्दी यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या  सापाला  पकडले. हा साप असून ६ फूट लांबीचा असून धामण जातीचा आहे. पाचव्या घटनेत एका  घरातील किचनमध्ये  भलामोठा साप  दडून बसल्याचे  घरांच्या महिलांना दिसल्याने त्यांनी घराबाहेर पळ काढला  त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. त्यांनतर  घटनेची माहिती सर्पमैत्रीण सिद्दी गुप्ता व सर्पमित्र दत्ता  यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन किचनमध्ये  दडून बसलेल्या साडे सहा फुटाच्या सापाला बाहेर काढले. साप पकडल्याचे पाहून घरातील सदस्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. 

सर्प मित्रां कडून ५ सापांना जीवदान सर्प मित्रां कडून ५ सापांना जीवदान Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads