Header AD

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची वाढीव विज बिलावर राज्य सरकारवर टीका


◆ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री यांचा खोटारडेपणा समोर आला आहे सरकाचा फ्यूज उडाला आहे...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  वाढीव वीजबिलांवरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली असून राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासन पाळण्यात अपयश आले आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासन फोल ठरली असून जनता सरकारला योग्य धडा शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता नागरिकांनी विजबील भरली नसल्याने विज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्युजच उडाले असल्याची टिका देखील चित्र वाघ यांनी केली आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वतीने कल्याण मधील आडिवली -ढोकळी  हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. महिलांना बचतगटांमार्फत शासकीय योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कुणाल पाटील यांनी बचत गटांच्या मोठ्या संख्येने नोंदण्या केल्या असून त्याचा फायदा घेण्याचे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.


आज पासून मध्यरेल्वेवर सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी लोकलची सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र हि लोकल सेवा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची फायदेशीर नसून रेल्वे सुरु होण्याने नोकरदार वर्गाला फायदा होणार नसल्याची टीका देखील चित्र वाघ यांनी केली आहे.


तर कुणाल पाटील याना चित्रा वाघ यांनी नगरसेविक नाही तर भावी आमदार झाल्याचे अभिमान होईल असं विधान केलं आहे. मात्र कोणत्या पक्षातून आमदार व्हावं असं प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता कुणाल पाटील हे कोणत्याही पक्षातून आमदार झालेले मला आवडतील मी माझा भाऊ आहे म्हणून कार्यक्रमाला आली असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला समाजसेवक अनिल पाटील, श्वेता पाटील यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होता.       

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची वाढीव विज बिलावर राज्य सरकारवर टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांची वाढीव विज बिलावर राज्य सरकारवर टीका Reviewed by News1 Marathi on February 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads