ओबीसी मोर्चांच्या पाठबळामुळे ठाण्यात भाजपाचा महापौर होईल ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर
ठाणे , प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चांच्या पाठबळामुळे ठाण्यात भाजपाचा महापौर होईल असे मत यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ठाण्यात व्यक्त केले .ठाणे शहर भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी मोर्चाच्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी योगेश टिळेकर बोलत होते.
ठाणे शहर भाजपा ओबीसी मोर्चाच्या नवीन कार्यकारणी अध्यक्ष सचिन केदारी यांच्या वतीने जाहीर करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र वाटप प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर,भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,प्रदेश सचिव संदीप लेले,भाजपाचे गटनेते संजय वाघुले,ओबीसी ठाणे शहर अध्यक्ष सचिन केदारी,ओबोसी प्रदेश महीला संपर्कप्रमुख वनिता लोंढे,सरचिटणीस कैलाश म्हाञे,गटनेते संजय वाघुले,ओबोसी महिला अध्यक्षा नयना भोईर आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भाजपामध्ये कोणतीही जात आली नाही तरी चालेल परंतु प्रत्येक जातीत भाजपचे विचार पोहचले पाहिजे कारण भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे कि तो जात पाहत नाही,कार्यकर्त्याची क्षमता,कर्तृत्व,नेतृत्व पाहून त्याला संधी दिली जाते .ओबोसीला विधानसभा जागेसाठी आरक्षण नसते तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा १०५ आमदारांपैकी ३७ आमदार ओबीसींचे आहेत हा भाजप पक्ष आहे.त्यामुळे आगामी काळात भाजपा ओबीसी मोर्चाच्या पाठबळाने ठाण्याचा महापौर भाजपाचा होईल असा विश्वास ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला
◆ओबिसी मोर्चा नवनियुक्त कार्यकारिणी! सरचिटणीस संघटन - किरण धत्तुरे, सरचिटणीस -
बाबू रामण्णा, उपाध्यक्ष - विजय हजारे,छत्रपती पूर्णेकर,अनिल देशमुख,नागेश भोसले,नरेश ठाकूर,विनोद भगत,विश्वनाथ वझे,सुनील बांगर,ऍड अमित पाटील,महेश तेरडे., चिटणीस - हरेश पूर्णेकर,शांताराम पाटील,धनंजय इळवे,सचिन पेडणेकर,दामोदर ठाणेकर,कृष्णकुमार यादव,रतन पवार,विशाल भोईर, , युवा संपर्क प्रमुख(अध्यक्ष) - अमित पाटील., सदस्य - राहुल वाघमारे,राजेश तेलंगे,चेतन बटवाल,उमेश चोणकर, अरूण पेणकर,अशोक विश्वकर्मा,राहुल झोडगे.

Post a Comment