Header AD

डोंबिवलीत महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर सुरु

 डोंबिवली , शंकर जाधव : भारतीय जनसंघाचे सरचिटणीस पंडित दिनदयाल यांच्या स्मृतीदिना  निमित्ताने दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण आणि विकास बोर्ड क्षेत्रीय निर्देशालय मुंबई, ( श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार प्रादेशिक संचालनालय, मुंबई विभाग आणि सुजित महाजन व रुपाली महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात दोन दिवसीय महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. 


या शिबिरात श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार प्रादेशिक संचालक ( प्रभारी ) चंद्रसेन जगताप, कामगार शिक्षक चंद्रकांत खोत, समाजिक कार्यकर्त्या निवेदिका जोशी, महिला उद्योजिका आशिया रिझवी, सुजित महाजन व रुपाली महाजन आदि उपस्थित होते.महिं बचतगट,केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय योजना,आरोग्य, व्यसनमुक्ती,महिलांना कायदेशीर जनजागृती,योगा,एकाग्रता,प्राणायाम आदीची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली.श्रममंत्रालयातर्फे शिबिरात उपस्थित प्रत्येक महिला लाभार्थ्यांना दोन दिवसीय शिबिराचे चारशे रुपये देण्यात येणार आहे.

डोंबिवलीत महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर सुरु डोंबिवलीत महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर सुरु   Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads