आदिवासीचे उभे असलेले पीक नष्ट केल्या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
कल्याण , कुणाल म्हात्रे : आदिवासींच्या उभ्या पिकावर जेसीबी फिरवणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात कल्याण तालुका टिटवाळा पोलिसांनी अखेर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश बुधराणी व त्याच्या इतर अज्ञात सहकाऱ्यांनी चार महिने राहिलेल्या उभे राहिलेल्या उभ्या पिकाचा नाश करण्याचा प्रयत्न जेसीबी लावून केला होता. आदिवासी शेतकर्यांच्या उभे पिकावर या भूमाफियांनी जेसीबी फिरवून उभी पिके जमीनदोस्त केली होती.
या प्रकारणात खोट्या कागदपत्रे आणि पैशाच्या जोरावर या भूमाफियानी ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला होता. कल्याण ग्रामीण पोलिसांनी आयपीसीच्या कलम ७ ४४७,४२७आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम (१) (एफ), १ (१) (जी), ((२) (वा) अंतर्गत सदर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या मुळे या आदिवासी शेतकर्यांच्या जमीन बळकावणा आरोपीना आता अटकेची भीती सतावत आहे. अटकेची तलवार या आरोपींवर लटकलेली दिसून येत आहे तर पीडितांचे नुकसान झाल्याने त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण तहसीलच्या वाघेरे पाडा गावात आदिवासी गरीब शेतकरी सुरेश सोमा हिंडोले सावळेराम आणि कठोडे पुजारी यांनी कल्याण तालुका टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. २५ व २६ ऑक्टोबरच्या रात्री, या आरोपीनी उभे असलेल्या पिकावर, प्रकाश बुढाराणी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी जेसीबी, ट्रॅक्टर चालवून शेती नष्ट करीत आदिवासी शेतकर्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न करीत उभे असलेले पीक नष्ट केले होते. या बाबत पीडित आदिवासी शेतकऱ्यानी कल्याण तालुका टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
परंतु तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे आणि उपस्थित पोलिस अधिकाऱ्यानी या आदिवासींना परत पाठवले असल्याचा आरोप आहे. या बाबत भूमाफियांच्या दबावाखाली एफआयआर नोंदविला गेला नाही असा देखील आरोप आदिवासी शेतकऱ्यांचा आहे.
याबाबत विश्व मानव कल्याण पदाधिकारी रामजी महेश्वर संजोत आणि परहीत चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यांनी या बाबत तक्रार दाखल केली होती. पोलिस तसेच राज्य सरकारकडे लेखी तक्रार या बाबत करण्यात आली होती. या पीडितांना नुकसान भरपाई आणि न्याय मिळावा यासाठी लेखी तक्रार दाखक करण्यात आल्यावर त्यानंतर पोलिसांनी बुधरणी आणि त्याच्या अज्ञात साथीदारां वर सुरेश सोमा हिंदोले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी तसेच अनुसूचित जाती, अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) च्या कलमा नुसार हा गुन्हा नोंदविला गेला आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे, परंतु अद्यापपर्यंत आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.
यापूर्वी ही भूमाफिया प्रकाश बुधानी आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध टिटवाळा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ही आताची तिसरी घटना आहे,परंतु अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बंजारी यांच्याशी संपर्क साधला असता, आदिवासी शेतकर्यांचे पीक नष्ट करण्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी या प्रकरणी सांगितले.

Post a Comment