Header AD

भिवंडीत महापौर चषक स्पर्धेस सुरवात

 भिवंडी : दि १६ (प्रतिनिधी  ) भिवंडी शहर व तालुक्यातील क्रिकेट रसिकांना वेड लावणाऱ्या चॅलेंज ग्राऊंड वरील महापौर चषक या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेस महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते नाणे फेकी करून शुभारंभ करण्यात आला आहे .या प्रसंगी उपमहापौर इम्रान खान ,सभागृह नेता शाम अग्रवाल ,विरोधी पक्ष नेता मतलुब सरदार व स्पर्धेचे आयोजक चॅलेंज स्पोर्मात चे संस्थापक माजी महापौर विलास आर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 


   
क्रिकेट म्हंटल की प्रत्येकाला वेड लावणारा खेळ, आबालवृद्ध या क्रिकेट चे दिवाने असताना भिवंडी महानगरपालिका सत्तेवरील कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलास आर पाटील हे स्वतः उत्तम क्रिकेट खेळाडू असून त्यांनी चॅलेंज स्पोर्ट च्या माध्यमा तून तब्बल ३२ वर्षांपासून चॅलेंज ट्रॉफी ही आपल्या सत्ता काळात कधी नगराध्यक्ष चषक , प्रेसिडेंट ट्रॉफी तर स्वतः सह महापौर पत्नी प्रतिभा पाटील यांच्या काळात आवर्जून महापौर चषक स्पर्धांचे आयोजन केले आहे .

       
यंदा महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन दिवसरात्र सत्रात केले असून या स्पर्धेचा शुभारंभ भव्य लेझर फायर  शो ने करण्यात आला .यंदा या स्पर्धेत संपूर्ण शहर व तालुक्या तून तब्बल १२० संघ सहभागी होत असून दहा दिवस सुरू राहणारी ही स्पर्धा यंदा भव्यदिव्य करण्यासाठी माजी महापौर विलास आर पाटील व त्यांचे सहकारी झटत असून या वेळी क्रीडांगणावर यष्टी मधील कॅमेरा ,माईक ,थर्ड अंपायर व आयपील सामन्यात वापरले जाणारे अतिउच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे वापरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. 


या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व जातीधर्मीय समाजात एकोपा नंदावा, खेळाडूवृत्ती निरामन व्हावी व या स्पर्धेतून खेळाडू आयपीएल व भारतीय संघात खेळून भिवंडी शहरासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल असा विश्वास महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी व्यक्त केला आहे .या उदघाटन प्रसंगी ठाणे विरुद्ध रायगड प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला .
भिवंडीत महापौर चषक स्पर्धेस सुरवात भिवंडीत महापौर चषक स्पर्धेस सुरवात Reviewed by News1 Marathi on February 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads