Header AD

अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले आणि बेतूरकर पाडा रहिवाशी मित्र मंडळ यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.       सध्या कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बंद असून अनेकांना रोजच्या जेवणाची देखील भ्रांत आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या शाळा देखील सुरु झाल्याने सर्व सामान्य कुटुंबांवर आर्थिक बोजा आला आहे. अशा या कुटुंबांना मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचा भार काहीसा हलका करण्यासाठी अलका सावली प्रतिष्ठान आणि बेतूरकर पाडा रहिवाशी मित्र मंडळ यांच्यावतीने बेतूरकर पाडा परिसरातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. माघी गणेशोत्सवात दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम न करता विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.       बुद्धीची देवता म्हणून गणरायाची ओळख असून सध्या माघी गणेशोत्सवाची सर्वत्र धूम आहे. अशातच बेतूरकर पाडा रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक माघी गणेशोत्सवात इतर कार्यक्रम न राबविता अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वितरीत केल्या असल्याची माहिती अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांनी दिली.       यावेळी बेतूरकर पाडा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश वायले, उपाध्यक्ष दिपक वायले, मंडळाचे सहकारी गणेश बेतूरकर, अजिंक्य दळवी, महेश ठाणगे, प्रतिक गांगुर्डे, नाना सुर्वे, जयेश वायले, प्रकाश वायले, आकाश वायले, दिपक सिन्हा, दिलीप पाटील, बंड्या कराळे, कल्पेश निलावंत, सागर वाघ, अजय पवार आदी सभासद, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.  

अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads