Header AD

कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण, एक मृत्यू

 

◆६०,६८१ एकूण रुग्ण तर ११४७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ८२ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   


 

       आजच्या या ५८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,६८१ झाली आहे. यामध्ये ६९५ रुग्ण उपचार घेत असून ५८,८३९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



तर आतापर्यत ११४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – १८डोंबिवली पूर्व – २२ डोंबिवली प-४, मांडा टिटवाळा- ४, तर मोहना    येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 



     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३ रुग्ण टाटा आमंत्रा येथून, ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तर ६ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण, एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ५८ नवे रुग्ण, एक मृत्यू    Reviewed by News1 Marathi on February 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टीसीच्या सतर्क तेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण कल्याण रेल्वे स्टेशन वरील घटना सी,सी,टीव्हीत कैद

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सकाळी साडेनऊ वाजता चालती पुष्पक एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्न...

Post AD

home ads