Header AD

माघी गणेश मूर्तींच्या विक्रीत ५० टक्क्यांची घट कोरोनाचा फटका गणेश मूर्तीकारांना
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. याचा फटका मूर्तीव्यवसायाला देखील बसला असून माघी गणेश मूर्तींच्या विक्रीत ५० टक्क्यांची घट झाली आहे.


 कोरोना काळात सण उत्सव धार्मिक कार्यक्रम आदींवर बंधने आल्याने बहुतांश लोकांनी थोडक्यात हे सण समारंभ आटोपते घेतले आहेत. याचा मोठा फटका गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना बसला आहे. कोरोनामुळे भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात बुकिंग कमी होती. आता अनलॉक झाल्याने माघी गणेशोत्सवात गणेश मूर्तीची बुकिंग वाढेल अशी मूर्तीकारांना अपेक्षा होती. मात्र त्यांची हि अपेक्षा फोल ठरली आहे. लोकांकडे पैसा नसल्याने मोठ्या मुर्त्या घेण्याऐवजी छोट्या मूर्त्यांना गणेश भक्त पसंती दर्शवित आहेत.


 दरवर्षी २५० ते ३०० माघी गणपतींची बुकिंग असते मात्र यंदा कोरोनामुळे हीच संख्या १३० ते १४० झाली आहे. गणेश मुर्त्यांच्या विक्रीमध्ये ५० टक्के घट झाली असून आधी सारखा व्यवसाय न राहिल्याने पारंपारिक व्यवसाय कमी झाला असल्याचे के. के. लिपणकर या मूर्तिकारांनी दिली.  त्यातच पिओपी वर बंदी असल्याने मूर्तिकार मोठ्या संकटात सापडले असून सरकारने मूर्तीकारांना मदत करण्याची मागणी देखील हे मूर्तिकार करत आहेत.   
माघी गणेश मूर्तींच्या विक्रीत ५० टक्क्यांची घट कोरोनाचा फटका गणेश मूर्तीकारांना माघी गणेश मूर्तींच्या विक्रीत ५० टक्क्यांची घट कोरोनाचा फटका गणेश मूर्तीकारांना  Reviewed by News1 Marathi on February 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads