Header AD

मनसेच्या दणक्याने कामगारांना मिळाला पगार..

 




डोंबिवली  ( शंकर जाधव )  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा पगार कंत्राटदारांकडून मागील ४ महिन्यांपासून दिला नव्हता. सर्व कर्मचारी  मनसे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज  घरत, म.न.का.सेना राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर  ह्यांच्या कडे तक्रार केली.


मनसे  नेते  तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश  भोईर, मनोज घरत राजेश उज्जैनकर, संदिप(रमा)भास्कर म्हात्रे, प्रितेश म्हामूणकर यांनी  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास  कोकरे यांची  भेट घेतली.  मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या थकवलेल्या पगाराबाबत जाब विचारला.कोकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून  सर्व कर्मचाऱ्यांचे १ महिन्याचा पगार दिला. 


पुढील ८ ते १० दिवसात उर्वरित पगार देऊन सर्व पुढे सुरळीत करणार असे आश्वासन दिले. ह्या बद्दल सर्व घंटागाडीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मनसे नेते तथा  आमदार प्रमोद  (राजू  )पाटील, प्रकाश भोईर ,मनोज घरत आणि राजेश उज्जैनकर ह्यांचे आभार मानले.  हयाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, उपविभाग अध्यक्ष संदीप (रमा)म्हात्रे, मनविसे डोंबिवली  शहर सचिव प्रितेश म्हामूणकर तसेच अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसेच्या दणक्याने कामगारांना मिळाला पगार.. मनसेच्या  दणक्याने कामगारांना मिळाला पगार.. Reviewed by News1 Marathi on February 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads