मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन रस्त्याची दुरावस्था, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
भिवंडी :दि २२ (प्रतिनिधी ) मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भिवंडी तालुक्यातून जात असून वळ पाडा ते काल्हेर दरम्यान मुंबई महानगरपालिके कडून या पाईपलाईन च्या निगा दुरुस्ती साठी खास रस्ता बनविण्यात आले आहे.या रस्त्यावर मागील दोन वर्षात ताडाळी ते काल्हेर दरम्यान चा रस्ता सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती केल्या नंतर ही एक वर्षातच या रस्त्याची दुरवस्था झाली असून येथील कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भिवंडी येथील नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे .
या रस्त्याचा वापर मुंबई महानगरपालिका पाईपलाईन साठी करीत असतानाच या रस्त्याचा वापर पाईपलाईन शेजारील कशेळी,काल्हेर,
पुर्णा,वळ,गुंदवली,कामतघर ,ताडाळी या गावातील स्थानिक ग्रामस्थ सुध्दा करीत असून सध्या ठाणे भिवंडी रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने रस्ता बॅरिकेटिंग केल्याने अरुंद झाला असल्याने या मार्गावर सदैव वाहतूक कोंडी होत असताना या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालकांना खड्डेमय झालेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ ठेकेदारा कडून करून घेणे गरजेचे असताना मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग या बाबी कडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निलेश चौधरी यांनी केला असून मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी स्वतः या रस्त्याची दुरवस्था पाहिल्यास त्यांना येथील झालेला भ्रष्टाचार लक्षात येऊ शकतो
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन रस्त्याची दुरावस्था, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
February 22, 2021
Rating:

Post a Comment