Header AD

कॉलेज प्रवेश प्लॅटफॉर्म ‘लीव्हरेज एज्यु’ची ४७ कोटी रुपयांची निधी उभारणीमुंबई, २३ फेब्रुवारी २०२१ : लीव्हरेज एड-टेक प्रायव्हेट लिमिटेडने सीरीज ए अंतर्गत ४७ कोटी रुपयांची (६.५ दशलक्ष डॉलर्स ) निधी उभारणी केली आहे. ही कंपनी लीव्हरेजएज्युडॉटकॉम, युनीव्हॅलीडॉटकॉम, आयव्ही१००डॉटकॉम आणि व्हर्चुअल फेअर प्लॅटफॉर्म युनीकनेक्ट चालवते. टुमारो कॅपिटलने या फेरीचे नेतृत्व केले. त्यांनी अक्षय चतुर्वेदी-स्थापित व संचलित व्यवसायात २६.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ब्ल्यूम व्हेंचर्स व डीएसजी कंझ्यूमर पार्टनर्स या विद्यमान गुंतवणूकदारांनी पहिल्यांदा गुंतवणूक केल्यानंतरही दमदार गुंतवणूक केली. त्यांनी या फेरीत २०.५ कोटी रुपयांची गुंतणूक केली. यापैकी निम्मी रक्कम दोन महिन्यांपूर्वी दिली तर उर्वरीत टुमारो कॅपिटलसह गुंतवली जाईल. अशा प्रकारे कंपनीने ३ फेऱ्यांमध्ये ६० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.


              विद्यार्थ्यांना योग्य प्रोग्राम शोधणे, डेस्टिनेशन शोधणे तसेच रोजगाराच्या दृष्टीकोनातून कॉलेज शिक्षणाकडे पाहण्यास मदत करण्याच्या उद्देशाने अक्षय चतुर्वेदी यांनी २०१७ मध्ये लीव्हरेज एज्युची स्थापना केली. या मंचाद्वारे विद्यार्थ्यांना योग्य उच्च शिक्षणाचा पर्याय, २५००+ वैयक्तिकृत मेंटॉर्स आणि लीडिंग ग्लोबल विद्यापीठांची योग्य निवड करण्यास मदत केली जाते.


              लीव्हरेज एज्युचे संस्थापक व सीईओ अक्षय चतुर्वेदी यांनी सांगितले की, 'नवीन बाजारपेठांममध्ये कंपनीचा धोरणात्मक विस्तार करण्यासाठी नव्या फेरीतील निधी वापरला जाईल. तसेच उत्पादनांचे अधिक नूतनाविष्कार केले जातील. अध्यापनशास्त्र आणि विद्यार्थ्यांना प्रथमच पुरवण्यात येणाऱ्या सुविधांवर लक्ष केंद्रीत केला जाईल.'


          लीव्हरेज एज्यु कंपनीच्या व्यवसायाचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिला म्हणजे, ही कंपनी विद्यार्थ्यांना योग्य मार्ग निवडण्याचा सल्ला देते. तसेच त्यांना शिक्षण कर्ज, व्हिसा, विदेशी मुद्रा, निवासाचे पर्याय यासारख्या मौल्यवान सेवाही पुरवल्या जातात. लीव्हरेज एड्यूच्या व्यवसायाचा दुसरा भाग हा विद्यापीठाच्या बाजूने आहे. सास आधारीत युनीव्हॅलीडॉटकॉम मंचाद्वारे विद्यापीठांना त्यांच्या प्रोग्रामसाठी उत्कृष्ट प्रतिभावान विद्यार्थी शोधण्यास मदत करते. तसेच भारतातील ३५ शहरांमधील ५०० पेक्षा जास्त लघु व मध्यम स्टडी अब्रॉड कंपन्यांना महाविद्यालयीन प्रवास सुलभ करण्यासाठी सक्षम करते. यासाठी लीव्हरेज एज्युच्या मालकीच्या तंत्रज्ञानापर्यंत प्रवेश देऊन तसेच जगातील २५० पेक्षा जस्त भागीदार विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो.

कॉलेज प्रवेश प्लॅटफॉर्म ‘लीव्हरेज एज्यु’ची ४७ कोटी रुपयांची निधी उभारणी कॉलेज प्रवेश प्लॅटफॉर्म ‘लीव्हरेज एज्यु’ची ४७ कोटी रुपयांची निधी उभारणी Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads