Header AD

रिपाई (ए) शहर कार्याध्यक्ष माणिक उघडे हे शहर कार्याध्यक्ष पदमुक्त...


जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांची पत्रकार परिषदेत घोषणा...डोंबिवली ,  शंकर जाधव :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे डोंबिवली शहर कार्याध्यक्षपदी माणिक उघडे यांची नियुक्ती डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केली होती.मात्र जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी बुधवारी डोंबिवली घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघडे यांची शहर कार्याध्यक्ष पदमुक्त केल्याची घोषणा केली.तर माणिक उघडे यांनी सांगितले कि माझी नियुक्ती डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केली आहे.त्यामुळे मी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे घडलेल्या या प्रकाराची माहिती देऊ असे सांगितले.     

डोंबिवली पश्चिमेकडील जयहिंद कॉलनी येथील आपल्या निवासस्थानी प्रल्हाद जाधव यांनी पत्रकार परिषदेत घेतली.पत्रकार परिषदेत माणिक उघडे यांची पाच वर्षांकरिता डोंबिवली शहर कार्याध्यक्षपदमुक्त केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.ते पुढे म्हणाले,शहरातील नाकाकामगार फलकावरून झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत गेली असून त्यामुळे पक्षाचे नांव खराब होत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात या गोष्टीमुळे त्याचा परिमाण पक्षावर होऊ नये म्हणून पाच वर्षांसाठी माणिक उघडेना पक्षातून काढण्याची कारवाई करावी लागत आहे.माणिक उघडे यांच्यामुळे नाहक भांडणे होत असून त्याचा परिणाम पक्षावर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  मात्र याबाबत माणिक उघडे यांनी विचारले असता ते म्हणाले, माझी नियुक्ती डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केली आहे.रिपाईच्या या घटनेमुळे पक्षात गटातटाचे राजकारण होत आहे का असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, आमच्यात कोणतेही गटतटाचे राजकरण नाही.तसेच रिपाई जिल्हाध्यक्ष जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या.

रिपाई (ए) शहर कार्याध्यक्ष माणिक उघडे हे शहर कार्याध्यक्ष पदमुक्त... रिपाई (ए) शहर कार्याध्यक्ष माणिक उघडे हे शहर कार्याध्यक्ष पदमुक्त... Reviewed by News1 Marathi on February 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads