Header AD

वडवली रेल्वे उड्डाणपूल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार मोहने, टिटवाळाकरांची वाहतूक कोंडीतुन होणार सुटका
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा ग्रामीण भाग "अ"  प्रभाग  क्षेत्र परिसरातील मोहने बल्याणी, उंबर्णीमोहेलीगाळेगावआंबिवली, टिटवाळा परिसर जोडण्यासाठी मागील १४ वर्षापासून रखडलेल्या  वडवली रेल्वे क्राँसिंग उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रेल्वे फाटक बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. यानंतर ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्यात आले असले तरी अद्यापि वडवली रेल्वे क्राँसिंग ४७ गेट  फाटकातून वाहतूकीसाठी सुरु आहे. पालिका प्रशासनाकडून मार्च २००७ मध्ये वडवली येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. दोन पदरी ७२० मीटर लांबीच्या या पुलाची रूंदी ७.५ मीटर असुन मनपा क्षेत्रातील सर्वात जास्त लांबी असणारा रेल्वे क्राँसिंग वडवली उड्डाण पुलाच्या उभारणीत आलेल्या अडथळ्याची शर्यत पार करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते. या पुलाच्या दोन्ही बाजूला खाजगी विकासकांनी गृहप्रकल्प उभारणीसाठी जागा खरेदी केल्या असून स्वताच्या जागेत पूल उभारण्यास किंवा पुलाचे पिलर टाकण्यास विकासकांनी अडथळा आणल्यामुळे पूल होणार का हा प्रश्न होता.


 मागील १४ वर्षाच्या कालावधीत अनेक पालिका आयुक्तांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला फारसे यश आले नाही. मात्र पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासकाच्या बैठका घेत त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करत लॉकडाउन काळात पुलाच्या कामाचा वेग वाढवला कनिष्ठ अभियंता जयंत विश्वास यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली ठेकेदाराकडुन कामाला गती देत  सद्यस्थितीत वडवली उड्डाण पुलाचे काम मार्गी लागले असुन रेल्वे ने त्यांच्या हद्दीतील सुमारे ९ कोटी रुपये  खर्चातुन पुलाचा २०१० मध्ये ढाचा साकारल असुन  मनपाला रेल्वेने ३.५ कोटी रू. २०१० दिले असुन मनपाने सुमारे १९.३५कोटी रू. खर्च करीत हा  पूल बधून पूर्ण झाले असून दोन्ही बाजूला रस्त्यावर पूल उतरविण्यात आले आहे. सध्या पुलावर रंगरंगोटी सुरु असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरु करणे शक्य होणार आहे.


   मोहनेआंबीवली टिटवाळा परिसरात मोठे गृहप्रकल्प आकार घेत असल्यामुळे या भागातील लोकसंख्या कमालीची वाढली आहे. मात्र रेल्वे फाटक ओलांडून नागरिकानावाहनांना ये जा करावी लागत असल्याने फाटकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. फाटक उघडे पर्यत वाहनचालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच वाहनाच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगा आणि रेल्वे रूळामध्ये वाहने थांबल्याने थांबवावी लागणारी रेल्वे वाहतूक यामुळे एकूणच वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. यामुळे यापुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी त्रस्त वाहनचालकाकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून केली जात होते.


 वडवली  रेल्वे क्राँसिंग उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असुन  पुलाचे उद्घाटन मार्चच्या पहिल्या आठवड्यात केले जाईल असे शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले. मोहने टिटवाळा कराची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असे चित्र यानिमित्ताने दिसत  आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सुचिता होळकर यांनी या पुलाबाबत आयुक्तांना निवेदन दिले असून, या पुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या उद्घाटनाची वाट न बघता लोकांच्या वापरासाठी हा पूल खुला करण्याची मागणी केली आहे. 

वडवली रेल्वे उड्डाणपूल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार मोहने, टिटवाळाकरांची वाहतूक कोंडीतुन होणार सुटका वडवली रेल्वे उड्डाणपूल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार मोहने, टिटवाळाकरांची वाहतूक कोंडीतुन होणार सुटका Reviewed by News1 Marathi on February 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads