Header AD

केडीएमसी आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी घेतली कोरोना लस

 



कल्याण ,कुणाल  म्हात्रे   :  कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आल्यांनंतर आता महापालिका कर्मचाऱ्याना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज पालिका कर्मचाऱ्याच्या लसीकरणाची सुरुवात पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना लसीकरण करून करण्यात आली तर पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरणास प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही कोरोनाची लस घेतली.


       कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरनास सुरुवात करण्यात आली .आतापर्यंत ९७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. तर आता फ्रंटलाईन वर्कर असलेल्या महापालिकेच्या ५२०० आणि १२००  पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. आज या मोहिमेत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी लस टोचून घेतली यांनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना न घाबरता लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केलं आहे.


   यावेळी पालिकेच्या साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील,  रुक्मिणीबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ टिके, कल्याणचे एसीपी अनिल पोवार, महात्माफुले चौक पोलीस स्टेशनचे व.पो.नि. नारायण बानकर, डॉ. प्रशांत पाटील आदीजण उपस्थित होते.    


केडीएमसी आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी घेतली कोरोना लस केडीएमसी आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी घेतली कोरोना लस Reviewed by News1 Marathi on February 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads