आगरी समाज प्रबोधन संस्थेची पहिली बैठक
डोंबिवली ( शंकर जाधव ) आगरी समाजात लग्न सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आणि समाजातील रूढी परंपरेत बदल व्हावा या उद्देशाने आगरी समाज प्रबोधन संस्थेची गेल्या वर्षी स्थापन झाली.आगरी समाजासाठी सामुदायिक लग्न सोहळा आयोजित करणे आणि आगरी समाजात लग्नसोहळ्यात अनावश्यक खर्च केला जातो तो कमी करावा तसेच आगरी समाजात लग्नातील रूढी परंपरेत बदल व्हावा या उद्देशाने संस्थेची स्थापना केल्याचे संस्थेचे पदाधिकारी काळू कोमास्कर यांनी सांगितले.
२०२० साली कोरोनाचे संकट असल्याने संस्थेने हा ठरवलेला सामुदायिक लग्न सोहळा रद्द करण्यात आला.त्यामुळे २०२१ साली सामुदायिक लग्न सोहळ्याबाबत संस्थेची पहिली बैठक डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर मंदिराच्या आवरात पार पडली. या बैठकीत अध्यक्ष गंगाराम शेलार,प्रकाश महाराज म्हात्रे,काळू कोमास्कर,जीवन मढवी,पदमाकर पाटील,अनंता जाधव,मारुती गायकर, दिलीप पाटील आणि लक्ष्मण पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.लवकरच संस्थेच्या वतीने सामुदायिक लग्न सोहळ्याचे आयोजन करणार असून पहिल्या दहा जोडप्यांना त्याच्या संसाराला हातभार म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येतील असे काळू कोमास्कर यांनी सांगितले.।

Post a Comment