Header AD

विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला कोट्यवधींच जल वाहिनी घोटाळा


जुने पाईप टाकून ठेकेदाराने वसूल केले आठ कोटी रुपये जलवाहिन्या फुटण्यामागे बाद झालेल्या पाईप्सचे कारण..


ठाणे , प्रतिनिधी  :  विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी ठाणे महानगर पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पालिकेच्या अधिकार्‍यांच्या कारभारामुळे ठेकेदारांकडून ठामपाला गंडा घातला जात आहे. असाच गंडा जलवाहिन्यांच्या कामांमध्ये घालण्यात आल्याचे शानू पठाण यांनी उघडकीस आणले आहे. कल्याण फाटा ते दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत जुन्या जलवाहिन्या टाकून एमकेई इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या कंपन्यांनी ठामपाकडून 8 कोटी रुपये उकळलेही आहेत. विशेष म्हणजे, याच कंपन्यांना ठाणे शहरात अन्य ठिकाणी सुमारे 200 कोटी रुपयांची कामेही दिली असल्याचा भंडाफोड शानू पठाण यांनी केला आहे. 


ठाणे महानगर पालिकेच्या वतीने जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम एमकेई इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. या कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे साहित्य वापरले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार, आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास शानू पठाण यांनी कल्याण फाटा येथे जाऊन पाहणी केली.


 या पाहणीमध्ये सदर ठिकाणी टाकण्यात आलेले पाईप्स हे जुने असल्याचे निदर्शनास आले. या पाईप्सवर चक्क 2010 साल नोंदविण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या 30 रुपये किलोने हे पाईप खरेदी करुन ठेकेदाराने ठामपाला गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या अधिकार्‍यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप  शानू पठाण यांनी केला आहे. 


या संदर्भात पठाण यांनी सांगितले की, ठाणेकरांच्या पैशांची कशा पद्धतीने लूटमार केली जात आहे.हे या प्रकारातून उघडकीस आले आहे. ठेकेदार आणि काही अधिकार्‍यांच्या साटेलोट्यांमुळे ही लूट सुरु आहे. ठाणेकरांचा पैसा कसा वाया घालवला जात आहे, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे. आता सदर ठेकेदाराकडून या जलवाहिन्या बुजविण्यात येणार आहेत. 


जर, या जलवाहिन्या बुजवण्यात आल्या तर पुरावेही नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आणि महापौरांनी तत्काळ याची पाहणी करुन संबधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी; एमकेई इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या कंपन्यांना ठाणे शहरात देण्यात आलेल्या 200 कोटींच्या कामांची तत्काळ चौकशी करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.


 चौकट

गेल्या काही दिवसांमध्ये जलवाहिन्या फुटण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. जलवाहिन्या फुटल्यामुळेच मुंब्रा, कौसा, दिवा, कळवा आदी भागात चार -चार दिवस पाणीपुरवठा ठप्प होत असतो. या जलवाहिन्या फुटण्यामागे जुन्या जलवाहिन्या हेच मुख्य कारण आहे. ठेकेदारांकडून जुने पाईप्स टाकले जात असल्यानेच या जलवाहिन्या फुटत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असेही शानू पठाण यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला कोट्यवधींच जल वाहिनी घोटाळा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला कोट्यवधींच जल वाहिनी घोटाळा Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads