Header AD

भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी वास्तु विशार दास अटक




भिवंडी दि. २० (प्रतिनिधी ) तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड येथे गोदामाची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते. याप्रकरणी नारपोली पोलोसांनी गोदाम मालका विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र गोदाम मालक हे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्र असल्याने हे गोदाम बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक , कंत्राटदार व वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानी नागरिकांनी पोलीस व शासकीय यंत्रणेकडे केली होती.
      

            अखेर नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सदर गोदाम इमारतीचे वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर ( वय ४९ वर्षे ) यास शनिवारी अटक केली आहे. सदर वास्तुविशारद हा कोसळलेल्या गोडावून इमारतीचे बांधकामाचा आर्किटेक्ट, सव्र्हेअर व कन्सलटींग इजिनियर असल्याचे व त्याचा गुन्हयात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली असून शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या कारवाईमुळे अनधिकृत व निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी वास्तु विशार दास अटक  भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी वास्तु विशार दास अटक Reviewed by News1 Marathi on February 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads