Header AD

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक
कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ताफ्यातील गाड्या खाली पार्क करून ते पाटीदार भवन हॉल येथील कार्यक्रमासाठी गेले यादरम्यान पाटील यांच्या ताफ्यातील अंगरक्षकाच्या स्कॉर्पियो गाडी रस्त्यावर उभी असताना गाडीने अचानक पेट घेतला .


भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली .याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले .मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले.
खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक Reviewed by News1 Marathi on February 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads