Header AD

चुलीवर भाकरी भाजत शिवसेनेने केला केंद्र सरकारचा निषेध

 

इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  इंधन आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून भाजप  सरकारवर चांगलेच तोंडसूख घेण्यात आले. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी कोळशावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजत केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आपला राग व्यक्त केला.


आधीच इंधन दरवाढीमूळे लोकांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ करून केंद्राने सामान्य नागरिकांना आगीतून फुफाट्यात लोटल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. तर यावेळी केंद्राच्या इंधन दरांबाबतच्या धोरणांविरोधातमोदी सरकारविरोधात शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत यथेच्छ टिकाही करण्यात आली.


 शिवसेनेच्या या आंदोलनात आमदार विश्वनाथ भोईरयांच्यासह शिवसेनेचे नेते अल्ताफ शेख, रवी पाटीलशरद पाटीलअरविंद मोरे, रमेश जाधव, जयवंत भोईर,   परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

चुलीवर भाकरी भाजत शिवसेनेने केला केंद्र सरकारचा निषेध चुलीवर भाकरी भाजत शिवसेनेने केला केंद्र सरकारचा निषेध Reviewed by News1 Marathi on February 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads