टीम समन्वयने ईर शाळ वाडीत साजरा केला व्हॅलेंटाईन डे
डोंबिवली ( शंकर जाधव ) टीम समन्वय यांचे प्रेम महाराजांवर असल्याने त्यांनी व्हॅलेंटाईन डे स्वराज्याचा अविभाज्य घटक असलेल्या गड किल्ल्यांवर जाऊन साजरा केला. टीम समन्वयने रायगड जिल्ह्यातील (कजर्त-खोपोली रोड जवळील चौक) ईरशाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ईरशाळवाडी येथील आदिवासी पाडा येथे जाऊन साजरा केला.
टीम समन्वय यांनी ती आणि तिचे चार दिवस अंतर्गत मासिक पाळी विषयी जनजागृती आणि मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच रद्दी ते समृध्दी या उपक्रमांतर्गत घरातील वापरात नसलेल्या वस्तूंची आणि लोकनिधीतून जमा केलेल्या वस्तूंचे आदिवासींना वाटप करण्यात आले. पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफ जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या मोहिमेत निलेश माने, अमित चव्हान, हर्षल तावडे, संदीप जाधव, दिनेश पिंगळे, तेजस पारखे आदी सहभागी झाले होते.
टीम समन्वयने ईर शाळ वाडीत साजरा केला व्हॅलेंटाईन डे
Reviewed by News1 Marathi
on
February 16, 2021
Rating:

Post a Comment