Header AD

आयुक्तांच्या लसीकरणाच्या आवहानाला प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रतिसाद


◆प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि सुहास गुप्ते यांनी घेतली कोरोनाची लस....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : वॅक्सीन हे अत्यंत सुरक्षित असून फ्रन्टलाईन वर्कर्सनी वॅक्सीन घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी नुकतेच केले असून आयुक्तांच्या या आवहानाला ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी प्रतिसाद देत कोरोनाची लस घेतली आहे.


महानगरपालिकेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ जानेवारी पासून कोविड-१९ च्या लसीकरणास सुरवात केलेली आहे आता पर्यंत ब-याच हेल्थ वर्कर्सनी कोविड-१९ ची लस घेतली असून महानगरपालिकने आता फ्रन्टलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरु केले आहे. महापालिकेचे सुमारे ५२००  फ्रन्टलाईन वर्कर्स आहेत  त्याचप्रमाणे सुमारे १२०० पोलिस कर्मचारी व १०० पोलिस अधिकारी हे देखील फ्रन्टलाईन वर्कर्स आहेत त्यांच्या लसीकरणास आता प्रारंभ झाला आहे.


पालिकेच्या ‘अ’ आणि ‘ब’ प्रभाग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील या लसीकरणाची सुरवात करण्यात आली असून प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि सुहास गुप्ते यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात स्वतः लस घेत आपल्या इतर कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.  

आयुक्तांच्या लसीकरणाच्या आवहानाला प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रतिसाद आयुक्तांच्या लसीकरणाच्या आवहानाला प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads