Header AD

सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाचा ७५ वा दिवस

 डोंबिवली  शंकर जाधव : अनधि बांधकामविरोधात समाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाला मंगळवारी ७ दिवस पूर्ण झाले आहे.निंबाळकर यांनी या दिवशी धोतर आणि उपरणे परिधान करून डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. दिल्लीत सुरु असेलल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला निंबाळकर यांनी आपले आंदोलन समर्पित केले असल्याचे सांगितले.


याबाबत निंबाळकर म्हणाले,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राजरोजपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.मात्र सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि प्रशासनाने आजवर माझ्या आंदोलनाची दाखल घेतली नाही.हि बांधकामे राजकीय पाठबळाने झाली आहे.अश्या इमारतीत घरे स्वस्त मिळत असल्याने सामान्य नागरिक आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करून घर घेतात. या घरांचे रजिस्टेशनहि सुरु आहे. समान्य नागरिकांची लुट सुरु होत असताना यावर कोणीही बोलत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाचा ७५ वा दिवस सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाचा ७५ वा दिवस Reviewed by News1 Marathi on February 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads