Header AD

मॉडिफाय वाहनांवर आरटीओची कारवाई दोन लाख पंचवीस हजारांचा दंड वसूल

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण कार्यालयाच्या वायुवेग पथक तसेच वाहतूक विभाग उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अनाधिकृत तसेच मॉडिफाइड सायलेन्सर च्या विरोधात विशेष तपासणी करीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर दंड आकारून दोन लाख पंचवीस हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  तानाजी चव्हाण यांनी दिली.


      शहरात मोठ्या प्रमाणात मॉडिफाइड केलेले दुचाकी वाहने आहेत, त्यांच्या कर्कश्य फायारिंगने रस्त्यावरील इतर वाहनांना व नागरिकांना त्रास होत असतो. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने कारवाईचा बडगा उल्हासनगर वाहतूक शाखेच्या सहकाऱ्यांनी केला यात २९ बुलेट मोटर सायकलच्या वाहनांची तपासणी करण्यात आली असून १४ वाहनांना प्रतिवेदन देण्यात आले आहे.


       या मोहीमे दरम्यान वाहनचालकांकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात आले आहेत. या कारवाईत वाहतूक शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर धरणे, पी.एस.आय साळुंखे तसेच परिवहन विभागाचे मोटर वाहन इन्स्पेक्टर शिंदे, जयवंत पोंडकुले, संजय फुंडे, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह वाहतूक शाखा तसेच परिवहन विभागाचे कर्मचारी  सहभागी झाले होते.
मॉडिफाय वाहनांवर आरटीओची कारवाई दोन लाख पंचवीस हजारांचा दंड वसूल मॉडिफाय वाहनांवर आरटीओची कारवाई दोन लाख पंचवीस हजारांचा दंड वसूल Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads