Header AD

हेल्मेट हे कायदा पालना साठी नव्हे तर स्वतः चा जीव वाचविण्या साठी आवश्यक बाळासाहेब पाटील




भिवंडी  , प्रतिनिधी   :  हेल्मेट हे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी नव्हे तर स्वतः चा जीव वाचविण्यासाठी घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे .ते भिवंडी अंजुरफाटा येथे वाहतूक विभागातर्फे बाईक रॅली व हेल्मेट वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार शांताराम मोरे ,वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय शिंदे ,वरिष्ठ पो निरी रवींद्र मायने ,आयोजक कल्याणजी घेटे आदी मान्यवर उपस्थित होते .


वाहतूक नियमांची सक्ती करणे चुकीचे असून त्या नियमांचे पालन करण्याची प्रत्येकाला स्वतः सह कुटुंबियांच्या जीवन सुरक्षेसाठी गरज वाटली पाहिजे त्यासाठी सर्वांनी शपथबद्ध आज झाले तर तेच या महिनाभर वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त राबविलेल्या कार्यक्रमाचे फलित ठरेल असे शेवटी सांगितले .
आमदार शांताराम मोरे यांनी वाहतुक नियमनाची गरज शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा सध्या भासू लागली असल्याचे स्पष्ट करीत  वाहतूक पोलीस ज्या वातावरणात दिवसरात्र काम करीत आहेत त्या कामाचे समाजाने कौतुक करणे गरजेचे असल्याचे आमदार शांताराम मोरे यांनी सांगितले .


कार्यक्रमाचे आईजक नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर मान्यवरांच्या शुभहस्ते महिनाभर सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला .या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थी,महिला,पत्रकार व संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील प्रातिनिधिक वाहतूक पोलीस यांना हेल्मेट वितरण करण्यात आले व त्यानंतर आयोजित बाईक रॅलीस पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला .या रॅलीत आमदार शांताराम मोरे , महिला वाहतूक पोलीस सहभागी झाले होते.
हेल्मेट हे कायदा पालना साठी नव्हे तर स्वतः चा जीव वाचविण्या साठी आवश्यक बाळासाहेब पाटील हेल्मेट हे कायदा पालना साठी नव्हे तर स्वतः चा जीव वाचविण्या साठी आवश्यक  बाळासाहेब पाटील Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads