आई वडील गुरूजन यांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे श्री योग वेदांत सेवा समिती यांच्यावतीने आगमी मातृ पितृ पुजन दिनाच्या निमित्ताने बालकांना मातृ पितृ गुरुजनांबद्दल आदराचे धडे देण्यात आले.
गौरीपाडा येथील दत्त मंदिराच्या प्रगांणात बालकांमध्ये मातृ पितृ गुरुजनांप्रति आदाराच्या भावना नित्य असणे गरजेचे असल्याचे संस्कार रूजण्याबाबत आध्यात्मिक गोष्टीतुन प्रेरित करीत आई वडील गुरूजनांचे महत्त्व सांगण्यात आले. आई वडील गुरूजन यांची सेवा करणे हीच सर्व श्रेष्ठ सेवा असुन त्यांचा आदर केला पाहिजे. असे बालकांना सांगत या प्रसंगी उपस्थित बालकांनी मातृ पुजन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री योग वेदांत सेवा समिती संत आसाराम बापु प्रेरित या संस्थेच्या सदस्या गीता ठुसे, पद्मा सिंग, उषा सिंग सुनिता सिंग, सुमन सिंग, वैशाली चौधरी, पुष्पा सिंग यांनी केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती विनिता म्हात्रे, रेखा म्हात्रे यांची होती. उपस्थित बालकांना १४ फेब्रुवारी रोजी आप आपल्या घरी मातृ पितृ पुजन करण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment