Header AD

ठाण्याच्या बाजार पेठेत मोफत अन्नछत्र

 

◆'अक्षयपात्र' आनंद भोजन उपक्रमाचा पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ ....


ठाणे, प्रतिनिधी  :  जिल्हयाच्या ग्रामिण क्षेत्रातुन ठाण्याच्या बाजारपेठेत भाजीपाला तसेच,तत्सम रानमेवा विकण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब आदिवासी व शेतकरी आबालवृद्धांच्या पोटाला चार घास अन्न मिळावे.यासाठी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मंगळवारी हेमंत कट्टेवार या भूतदया जपणाऱ्या हरहुन्नरी उद्योजकाने ठाणे स्टेशन रोडवरील विठठल मंदिरात 'अक्षययात्र' आनंद भोजन उपक्रमाचा शुभारंभ केला.शुभारंभदिनी शेकडोच्या संख्येने नागरिक तसेच,मान्यवरांनी या मोफत आनंद भोजनाचा लाभ घेतला


दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ उद्योजक हेमंत कट्टेवार यांनी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान व विश्वनाथ विनायक पंडीत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद भोजन अन्नछत्र सुरू करून ना.शिंदे यांना एकप्रकारे वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.विठ्ठल मंदिराच्या आवारात सुरू झालेल्या या विनामुल्य अन्नछत्रात नागरिकांना दररोज सकाळी ९ आणि दुपारी १२ ते १ वाजेपर्यत पोटभर भोजनाचा आस्वाद घेता येणार असल्याची माहिती कट्टेवार कुटुंबियांनी दिली.या आनंद भोजन उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ना.एकनाथ शिंदे,खासदार राजन विचारे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ठाण्याच्या बाजार पेठेत मोफत अन्नछत्र ठाण्याच्या बाजार पेठेत मोफत अन्नछत्र Reviewed by News1 Marathi on February 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads