Header AD

बजरंग दल कार्य कर्त्यांच्या सर्तकते मुळे दिड टन गोमांस जप्त

 

■भाजीपाल्याच्या आढून जनावरांच्या मांसाची वाहतूक....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  भाजीपाल्याच्या टेम्पोतच  मालेगाववरून  डोंबिवलीच्या वेशीवर आलेल्या एका टेम्पोमधून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सर्तकतेमुळे  दिड टन गोमांस टेम्पोसह मानपाडा पोलसांनी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे.  विशेष म्हणजे मार्च २०१५ पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडीकल्याणमुंब्राठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रकटेम्पोमधून इतर जिल्ह्यासह पर राज्यातून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा  बजरंग  दलाच्या  कार्यकर्त्यांनी  उघडकीस  आणले आहे.


डोंबिवलीतील काटई नाक्यावर आज सकाळच्या सुमारास  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना एका भाजीपाला टेंपो क्रंमाक MH.03.CV.8853  यामध्ये गोमांस  वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे  बजरंगदल कार्यकर्तात्यांनी वरून भाजीपाला असलेल्या टेपोची आतमध्ये पहाणी केली असता,  जनावराचे मास असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्वरीत मानपाडा पोलिसांच्या ताब्यात हा टेम्पो व चालकास ताब्यात दिले. त्यांनतर पोलिसांनी बेकायदा जनावरांचे मास वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.  खळबळजनक बाब  म्हणजे मालेगावातून जनावरांची कत्तल करून या  टेम्पोमधून जनावरांच्या मांसाची  वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.  

बजरंग दल कार्य कर्त्यांच्या सर्तकते मुळे दिड टन गोमांस जप्त बजरंग दल कार्य कर्त्यांच्या सर्तकते मुळे  दिड टन गोमांस जप्त Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads