Header AD

कल्याण पूर्वेतील शिव जयंती उत्सवात कोरोना योद्धांचा सन्मान


■सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा स्त्युत्य उपक्रम...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात कोरोना कालावधीत जनसामान्यांच्या जिवाची काळजी घेण्यासाठी स्वःताच्या जिवाची पर्वा न करता  प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ज्या शासकीय सेवेतील व्यक्तींनी मोलाचे असे कार्य केले आहे अशा व्यक्तींचा ' 'कृतज्ञता सन्मान पत्र गुलाब पुष्प आणि ऐतिहासीक पुस्तक देऊ सन्मान करण्यात आला.


कोरोनाच्या वाढत्या धोक्याची चाहूल लक्षात घेता मर्यादीतच निमंत्रितांच्या उपस्थितीत तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात शुक्रवारी  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. त्या नंतर बासरीवाला ढोल पथकाने तालबद्ध गजरात महाराजांना मानवंदना दिली. याच दरम्यान समारंभ स्थळी आगमन झालेल्या महाराजांच्या पालखीचे 'मानवी पाय घड्याघालुन जल्लोषात स्वागत करण्यात आले. या समयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावातील एका शिवप्रेमीने शिवाजी महाराजांचे मनोगत व्यक्त करतांना या युगाबाबत शिवाजी महाराजांच्या मनातील  भावना  कथन केल्या.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहू राजे साळवेप्रभाग ५ ड चे प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडेप्रभाग ४ जे चे प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील व त्या त्या क्षेत्रातील प्रमुखांच्या प्राथिनिधिक उपस्थितीत पोलिस कर्मचारीसफाई कामगारडॉक्टर्सनर्सेस यांचा नावांसह छापाई केलेले 'कृतज्ञता  सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर कोरोना कालावधीत वृत्त पत्रांची काही काळ छपाई आणि वितरण बंद असतांनाही कोरोना संदर्भातील योग्य ती माहीती आणि जनजागृतीचे काम दृकश्राव्य आणि समाज माध्यमातून जन सामान्यांपर्यंत पोहचवीण्याचे काम करणाऱ्या प्रिन्ट आणि इलेक्ट्रानिक मिडीयातील पत्रकारांचाही कृतज्ञता सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.


कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनीही भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून त्यांना वंदन केले. शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईरविद्यमान अध्यक्ष रुपेश गायकवाडकार्याध्यक्ष अभिमन्यु गायकवाडसचिव राजेश अंकुश  तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य नरेंद्र सुर्यवंशी,  वसंतराव सुर्यवंशी अनिल घुमरे,  के. एल. वासनकर यांच्यासह जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड,  ग्रामस्त पंच कमिटीचे सुनिल गायकवाड, परिवहन सदस्य संजय मोरे, सुभाष म्हस्के,  सेवा निवृत्त पोलिस अधिकारी जगदीश लोहळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील शिव जयंती उत्सवात कोरोना योद्धांचा सन्मान  कल्याण पूर्वेतील शिव जयंती उत्सवात कोरोना योद्धांचा सन्मान  Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads