Header AD

शिवसेना शाखेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचा सन्मान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  शिवगंगानगर शिवसेना शाखेच्या माध्यमातून व शिवसेना उपविभागप्रमुख, नगरसेवक रविंद्र पाटीलमहिला उपविभाग संघटक रुपाली पाटील यांनी "ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा "आयोजित केला होता. यामध्ये १५० ते २०० जेष्ठ नागरिकांना प्रवासी बॅग व गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी आमदार डॉ बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरीउपशहरप्रमुख परशुराम पाटीलउपजिल्हा संघटक अंजली राऊतमाजी नगरसेवक सुभाष साळुंखे, तुळशीराम चौधरी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गायकवाड, ठाणे जिल्हा आयटक सचिव जे.आर पाटील तसेच शिवगंगानगर शिवसेना शाखेचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नगरसेवक रविंद्र पाटील यांनी केलेल्या ५ वर्षाच्या कामाचे व कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. 

शिवसेना शाखेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचा सन्मान शिवसेना शाखेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on February 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads