कोरोनाचे नियम पाळून राष्ट्रीय सूर्य नमस्कार दिवस साजरा
कल्याण , कुणाल म्हात्रे : सुभेदार वाडा कट्टाच्या वतीने कल्याण मधील शारदा मंदिर शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले. कोरोना कालावधी असल्यामुळे सर्व शाळा बंद आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय सूर्य नमस्कार दिनाचे सातत्य असावे तसेच या उत्कृष्ठ कार्यक्रमात खंड पडूनये या साठी शारदा मंदिर हस्कुल कल्याण येथे सार्वजनिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी झूम च्या माध्यमातून हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात आला. यात ३४३ शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. तसेच प्रत्यक्ष रित्या शासनाच्या नियमांचे पालन करून ५० विद्यार्थ्यां आणि शिक्षक यांनी प्रत्यक्ष रित्या सहभाग घेतला.
Post a Comment