Header AD

इंधन दरवाढ आणि वाढीव विज बिलां विरोधात कल्याणात मनसेचा मोर्चा


◆केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांची दिशाभूल - मनसेचा आरोप...


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि वाढीव वीजबिलांविरोधात कल्याणात मनसेने कल्याण रेल्वे स्टेशन ते कल्याण तहसील कार्यलयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे घालून शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते.


मनसेच्या वतीने तहसील कार्यलयाबाहेर ठिय्या आंदोलन करत अन्यायकारक दरवाढ रद्द झालीच पाहीजेकेंद्र सरकार हाय हायराज्य सरकार हाय हायवीजबिल दरवाढ रद्द झालीच पाहीजे अशा जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोन नेत्यानी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर झालेला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून गेल्या आठवडाभरापासुन मेळावे आंदोलने हाती घेतली जात असल्याचं दिसून येत असून मनसे नेत्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येत्या काळात दिसून येईल.


       दरम्यान केंद्रात भाजपाला आणि राज्यात महाविकास आघाडीला नागरिकांनी सत्ता कशासाठी दिली आहे हा मोठा विषय असून हे पक्ष एकमेकांविरोधात केवळ मोर्चे काढून आंदोलने करत आहेत. तुम्हाला सत्ता केवळ मोर्चे आंदोलने करण्यासाठी दिली आहे का, सत्तेत बसून तुम्ही  निर्णय काय घेता असा सवाल खडा सवाल यावेळी मनसेचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश भोईर यांनी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.

   

       या मोर्चात मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, महाराष्ट्र राज्य सचिव इरफान शेख, उर्मिला तांबे, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, प्रकाश भोईर, कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अनंता गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.  
इंधन दरवाढ आणि वाढीव विज बिलां विरोधात कल्याणात मनसेचा मोर्चा इंधन दरवाढ आणि वाढीव विज बिलां विरोधात कल्याणात मनसेचा मोर्चा Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads