लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा संघटक संगीता रामटेके, जिल्हा सहायक आयुक्त सुष्मा चौधरी, उपाध्यक्ष बी एन भोसले, सहसचिव निवेदिता कोरान्ने, विश्वास विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती पाटील, शारदा मंदिर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन, स्पर्धा परीक्षक म्हणून पाठक मॅडम उपस्थित होते.
चिंतन दिनाचे प्रास्ताविक करताना सचिव दिलीप तडवी यांनी चिंतनदिनाचे महत्व विषद केले. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात संस्थेने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या अभिनय व नृत्य स्पर्धा ऑनलाईन आयोजित केल्या होत्या तर काव्यवाचन व कथाकथन स्पर्धा प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी संपन्न झाल्या. विजेत्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी ३० स्काऊटर व गाईडर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा संघटक संगीता रामटेके यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी कौतुक केले. तसेच सर्वांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे नियोजन पटवर्धनर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर्णा हर्षे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण खाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निवेदिता कोरान्ने यांनी मानले.
Post a Comment