कल्याण स्थानिक संस्थेचा गणवेश दिन साजरा
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचा स्काऊट गाईड गणवेशदिन गुरुवारी मोहिंदरसिंग काबुलसिंग इंग्लिश हायस्कूल कल्याण पश्चिम येथे साजरा झाला. कार्यक्रमाला १० स्काऊट गाईड २० मास्टर/ कॅप्टन उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे मोहिंदर स्कूलचे संचालक परमवीर सिंग सैनी, ठाणे जिल्हा संघटन आयुक्त गाईड संगिता रामटेके उपस्थित होते. सूत्रसंचलन कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी केले. स्वागतानंतर प्रास्तविक चिटणीस दिलीप तडवी यांनी केले. ४ स्काऊट गाईड कब राज्यपुरस्कार प्राप्त यांचा मेडल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
कल्याण स्थानिक संस्थेचा गणवेश दिन साजरा
Reviewed by News1 Marathi
on
February 12, 2021
Rating:

Post a Comment