Header AD

पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे भिवंडीत आंदोलन

 भिवंडी : दि. ५ (प्रतिनिधी )  केंद्र सरकार कडून मागील तीन महिन्यां पासून पेट्रोल डिझेल किमतीं मध्ये दररोज वाढ केली जात आहे .त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक ,माल वाहतूक करणारे वाहन चालक हवालदिल झाले असून त्याविरोधात संपूर्ण देश भरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना महाराष्ट्रात शिवसेना पक्षाने सर्वत्र तीव्र आंदोलन करीत पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केली.


त्या पार्श्वभूमीवर भिवंडीत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तहसीलदार अधिक पाटील यांना आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे निवेदन दिले .या वेळी पंचायत समिती उपसभापती सबिया इरफान भुरे, विष्णू चंदे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक ,दर्शना करसन ठाकरे,दीपक पाटील,जय भगत ,प्रेमनाथ म्हात्रे ,राजेंद्र काबाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते .

पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे भिवंडीत आंदोलन पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे भिवंडीत आंदोलन Reviewed by News1 Marathi on February 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads